Nashik

थोरात विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी

थोरात विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी

मोहाडी (वार्ताहर) दिनांक २३ जानेवारी

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
यावेळी उपशिक्षक शिवाजी शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे, बालपण, शिक्षण व स्वातंत्र्य आंदोलनाविषयी माहिती दिली. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा,हा नारा त्यांनी देशवासियांना दिला. व लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाविषयी माहिती दिली व आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे सांगितले
कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख, शशिकांत कदम, कृष्णा उगले, संजय भुजबळ, हिरामण गांगुर्डे पोंटिदे मामा आदी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिता पवार यांनी केले व आभार प्रदर्शन मनिषा जाधव यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button