Akola

क्रांतीविर बिरसा मूंडा यांचे विचार युवकांनी अंगीकृत करावे

क्रांतीविर बिरसा मूंडा यांचे विचार युवकांनी अंगीकृत करावे

प्रतिनिधी : विलास धोंगडे अकोला

अकोला : अकोला बिरसा मूंडा यांचे विचार युवकांनी अगंकृत करावे असे प्रतिपादन बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी केले आहे .यावेळी त्यांनी बिरसा मूंडा यांच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. पातूर तालुक्यात बिरसा मूंडा यांची जयंती आदिवासी बांधवातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त पातूर तालुक्यातील ग्राम चारमोळी. येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय राऊत (वक्ता) प्रा प संतोष पसतापूरे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दल जिल्हा अकोला संतोष ठाकरे हे होते. कार्यक्रमाला पातूर पंचायत समिती सदस्य श्यामभाऊ ठाकरे संरपच पस्तापूरे पोलीस पाटील अशोक लठाड चोंढी सुरेश खूळे सर ताजने सर अरूण ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष विलास धोंगडे रामदास शेळके विक्रम झळके अशोक शेळके रामदास धोंगडे महादेव खूळे. दगडू कवडे आदिची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे यांचे हस्ते क्रांतीविर बिरसा मूंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तथा पुष्पहार अर्पण करून. त्याना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनाी सुद्धा बिरसा मूंडा यांच्या प्रतिमेची पूजा केली. क्रांतीविर बिरसा मूंडा यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त. आदिवासी बांधवातर्फे काढण्यात येणार्‍या भव्य रॅलीला कोरोनामूळे. फाटा देत हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने व नियमांचे पालन करूण घेण्यात आला. यावेळी बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतांना संतोष ठाकरे यांनी बिरसा मूंडा आद्य क्रांतीविर म्हणून ओळखले जातात. तर त्यानी देशासाठी समाज बाधंवा साठी महत्वाचे कार्य केले. त्यांचे विचार इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार युवकांनी अंग अंगीकृत करावे. व त्यांचा आदर्श घ्यावा. असे आव्हान केले तर आदिवासी समाज बांधवांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण व बिरसा क्रांती दल सदैव त्यांच्या पाठीशी आहे असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय कवडे यांनी केले. कार्यक्रमाला विनोद करवते. विजय लोखंडे. मनोज शेळके, दामोदर खूळे. नितीन शेळके, सतीश शेळके, शंकर खूळे. किसन लठाड. उल्हास धोंगडे. आदिसह तालुक्यातील जांब आलेगाव चोंढी कोसगाव धोदानी चिचखेड सावरखेड झरंडी अंधारसावी पातूर तांदळी खामखेड व विविध गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button