पलूस

बिरसा क्रांती दल शिराळा तालुका कार्यकारिणी निवड उत्साहात

बिरसा क्रांती दल शिराळा तालुका कार्यकारिणी निवड उत्साहात

पलूस / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दल शिराळा तालुका कार्यकारणी निवड उत्साहात करण्यात आली. प्रथम निसर्ग देवतेचे पुजन करण्यात आले.
त्यावेळी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. बिरसा क्रांती दल शिराळा तालुका अध्यक्ष पदी पुंडलिक भोये, उपाध्यक्ष कांतीलाल शिरवाळ, महासचिव मनिराम चौधरी, सचिव भगवान महाले, कार्याध्यक्ष अतुल पावरा, सल्लागार हरिभाऊ घोडे, कोषाध्यक्ष ईश्वर पारधी, संघटक महेंद्र गावित, सहसंघटक जगन चौधरी, यांची नियुक्ती झाली.
त्यावेळी बिरसा क्रांती दल सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाडवी, मुकेश गावित, युवराज फसाळे, विलास कराळे, ईश्वर चौधरी, अतुल पावरा विलास चौधरी आदी नागरिक उपस्थित होते.
आंबवणे म्हणाले, बिरसा क्रांती दल हे संघटन राज्य स्तरावर काम करते संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी हे कवी असून अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्याचे नागपूर विद्यापीठात टि. व्हाय बी ए च्या अभ्यासक्रम मध्ये कवीता आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमराव केराम हे विद्यमान आमदार म्हणून किनवट येथून निवडून आले आहेत. राज्य महासचिव प्रमोद घोडाम हे एक उत्तुंग अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतात. राज्य उपाध्यक्ष दिनेश आंबुरे हे संघटनेचे जोरदार संघटन करतात. राज्य उपाध्यक्ष सदानंद गावित हे आदिवासी विकास विभाग मंत्रालय येथे सचिव म्हणून त्यांनी काम करून निवृत्त झाले. आहेत अशा चांगल्या व्यक्तींसोबत आपण जोडले गेलो आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. संघटनेत प्रत्येक व्यक्तीने मनापासून सहभागी झाले पाहिजे आपण आपली नोकरी सांभाळून समाजकार्य करा महाराष्ट्रात पंचवीस आदिवासी आमदार व चार खासदार आहेत पण आदिवासींचे प्रश्न विधानसभेत लोकसभेत मांडले जात नाहीत याची खंत वाटते त्यासाठी आपण नोकरदार म्हणून एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत आपण आश्रम शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषद मध्ये शिकलो शिक्षण घेतलं म्हणूनच आज अनुसूचित जमाती या प्रवर्गात नोकरीला लागलो तसे आज समाजाला सामाजिक शिक्षण देणे गरजेचे आहे त्यासाठी संघटित झाला पाहिजे संघटित झाल्यावर कधीही आपल्याला कोणीही मदतीला धावून येतं आपला बांधव अडचणीत असेल तर संघटना त्याच्या पाठीशी उभी राहते त्यासाठी संघटनेचे सभासद असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये बिरसा क्रांती दल काम करते.
राजेंद्र पाडवी म्हणाले, पेसा कायदाची अंमलबजावणी सुरु आहे त्याकडे आदिवासी बांधवांनी प्रभावी पणे राबवण्यासाठी ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे ग्रामसेभेमध्ये ठराव हा मान्य केला जातो. पेसा कायदा 1996 ला महाराष्ट्रात लागू केला या कायद्यामुळे ग्रामपंचायतींना निधी भरपूर येतो तो आपण ठरवू त्या ठिकाणी खर्च केला जाऊ शकतो त्याचा अभ्यास केला पाहिजे डीबीटी सारखी योजना रद्द झाली पाहिजे. अशा अनेक विषय आदिवासी समाजामध्ये आहेत ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊया असे आवाहन केले. ते प्रास्ताविक भाषणात बोलत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिंद्र गावित यांनी केली, आभार कांतीलाल झिरवाळ यांनी मांडले.

Leave a Reply

Back to top button