Nandurbar

बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महासचिव पदी बळीराम पावरा यांची निवड

बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महासचिव पदी बळीराम पावरा यांची निवड

नंदुरबार : बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा महासचिव पदी बळीराम पावरा यांची निवड करण्यात आली आहे. बळीराम पावरा हे पेशाने शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघूनच त्यांची जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. या सभेत नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात राजेंद्र पाडवी यांची विशेष पद निर्माण करून जिल्हा प्रवत्ता पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा नंदुरबार कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे .
जिल्हाध्यक्ष प्रभारी साहेबराव कोकणी ,उपाध्यक्ष 1)राहूल पावरा,2)दयानंद चव्हाण,महासचिव बळीराम पावरा,कार्याध्यक्ष प्राध्यापक वसंत पावरा ,कोषाध्यक्ष लक्ष्मण वळवी,सहसचिव दिलवर वसावे,सल्लागार मंगेश सुळे,प्रवक्ता राजेंद्र पाडवी ,महिला प्रतिनिधीसौ.वनिता पावरा ,संघटक रतिलाल पावरा ,प्रसिद्धी प्रमुख विजय वळवी, सदस्य1) पंकजकुमार पाडवी 2)गुरूदास वसावे 3)विजय वळवी4)अशोक वळवी 5)सौ. बेबी कोकणी यांची निवड करण्यात आली आहे.
सभेला सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे व राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली हे उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांचे मनोज पावरा यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button