Pune

आदिवासी भागातील कोव्हिड रुग्ण होमकोरनटाईने इतरांना धोका – रुग्णांना शिनोली येथे हलवण्यात यावे – बिरसा क्रांती दल ( बिकेडी ) ची मागणी

आदिवासी भागातील कोव्हिड रुग्ण होमकोरनटाईने इतरांना धोका – रुग्णांना शिनोली येथे हलवण्यात यावे – बिरसा क्रांती दल ( बिकेडी ) ची मागणी

दिलीप आंबवणे आंबेगाव

पुणे : आदिवासी भागातील कोव्हिड रुग्ण होमकोरनटाईने असल्याने गावातील इतरांना धोका निर्माण झाला आहे. कोव्हिड रुग्णांना शिनोली येथे हलवण्यात यावे. किंवा तळेघर, तिरपाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीत ठेवा. नवीन इमारती धूळखात पडून असून प्राथमिक आरोग्य केंद्र तिरपाड नवीन इमारत तात्काळ सुरू करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की पश्चिम भागात आदिवासी भागातील आहुपे, पिंपरगणे, आघाणे, डोण, नानवडे, नाव्हेड, भोईरवाडी, कुशिरे, पाटण या गावांना या दवाखान्याचा फायदा होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत असलेला कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता तिरपाड येथे धूळ खात असलेल्या दवाखाना तात्काळ सुरू करावा. आदिवासी भागात पाच कोटीची इमारत बांधून तिचा प्रशासन उपयोग करत नसेल तर काय उपयोग आहे असा सवाल बिरसा क्रांती दलाने केला आहे. तरी दवाखान्यात तात्काळ कंत्राटी पद्धती वर कर्मचारी भरण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र तिरपाड दवाखाना सुरू करावा.
तिरपाड हे आदिवासी भागातील मध्यवर्ती गाव असल्याने बराच गावातील कोव्हिड 19 रूग्ण हे घरात होमकोरानटाईन केलेले आहेत ते तात्काळ दवाखान्यात घेऊन जावे गावामध्ये रूग्णाकडे लक्ष देणारे कोणी नसल्याने तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन नसल्याने आदिवासी भागातील इतर लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. आदिवासी भागात कोव्हिड रुग्ण घरात ठेवणे म्हणजे रूग्णाच्या जीवाशी खेळणे होईल. तरी आदिवासी भागातील कोव्हिड रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून जिल्हा प्रशासनाने तातडीने आदिवासी लोकांना कोव्हिड 19 बदल प्रबोधन सुरू करावे आदिवासी समाजात तरूण वर्ग सोडला तर शिक्षणाचा अभाव असल्याने कोव्हिड 19 बदल बराच प्रमाणात ज्ञान नाही. तसेच ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, डॉक्टर हे निवासी राहत नाही.
आदिवासी भागात ग्रामपंचायतीच्या पातळीवर नियोजन अभाव असल्याने कोव्हिड 19 या रोगाच्या महामारी नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदिवासी भागात उपाययोजना प्रबोधन सुरू करावे अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी बी घोडे, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, बाळासाहेब डोळस, अनिल भोईर, डॉ हरिष खामकर, मारूती तळपे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button