sawada

सावदा येथील बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा प्रकरणी : रावेर तहसीलदारांची भूमिका संशयास्पद – १५ दिवस उलटूनही पंप मालकांवर गुन्हा दाखल नाही!

सावदा येथील बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा प्रकरणी : रावेर तहसीलदारांची भूमिका संशयास्पद – १५ दिवस उलटूनही पंप मालकांवर गुन्हा दाखल नाही!

ठळक मुद्दे

सावदा : अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणी रावेर ते जळगांव महसूल अधिकाऱ्यांनी घेतली धृतराष्ट्राची भूमिका.

बरेच दिवस उलटूनही बायो डिझेल विक्रीचा गोरख धंदा करणारे पंप मालक यंत्रणा मुळे आजही मोकाट!

जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव हे फक्त सक्तीची सूचना देऊन झाले मोकळे.

जिल्हाधिकारी सह वरिष्ठांनाकडे याप्रकरणाची काही जागृत नागरिक लवकरच तक्रार दाखल करणार.

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील बहुचर्चित बायोडिझेलचे पंप टाकून अवैधरित्या विक्रीचा गोरखधंदा आणि गेल्या काही दिवसांपूर्वी रावेर पोलिसांनी राज्यात रॉकेल बंदी असताना रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री उघडकीस आणून कौतुकास्पद कारवाई केली. यानंतर सावदा येथील बायोडिझेलच्या पावत्या असलेल्या वाहनास सुद्धा त्यांनी पकडून संबंधित महसूल विभागात माहिती दिली मात्र यानंतर ही वाहनास सोडून देण्यात आले.

यामुळे सावदा येथील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपित पद्धतीने अवैधरित्या भाड्याने घेतलेली जागेवर झुलेलाल बायो डिझेल व रावेर रोड वरील महिंद्रा डाव्या समोर पंप टाकून बिनदिक्कतपणे बायोडिझेल विक्री करण्याचा गोरखधंदा समोर आला. यासंदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्याने बायोडिझेल एक पंप सील झाला.व रावेर रोडवरील दुसरा पंपावरअद्याप संबंधित यंत्रणांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. बायोडिझेल विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करणे बाबत पोलीस व महसूल विभाग यांच्यात देखील जुंपली होती. यामुळे दोन्ही पंप चालक मालक आजही मोकाट फिरत आहे.

एकाकडे जिल्ह्यात बायोडिझेलची साठवणूक, विक्री, उत्पन्न, करणेबाबत परवानगी नाही यामुळे जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ प्रमाणे कारवाई संदर्भात दि. १६ जुलै रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी हे फक्त सूचना देऊन मोकळे झालेले दिसत आहे. तसेच दुसरीकडे रावेर तहसीलदार यांनी बरच कालावधी उलटूनही सदरील पंप चालकांवर कायदेशीर ठोस कारवाई केली नसून आता याप्रकरणी रावेर ते जळगांव दरम्यान महसूल विभाग व दोन्ही पंप चालक यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

विशेष

तसेच यात विशेष असे सावद्यात बायोडिझेलचे दोन पंप असून एका पंपास फक्त सील करणे व रावेर रोड वरील दुसरे पंपाला अध्याप सिल न करणे,

आज पावेतो बायोडिझेलची विक्री व त्याचा शिल्लक साठा, पंपातून त्याचे नमुने सॅम्पल तपासणी व चौकशी कामी कारवाई न होणे,राज्यात रॉकेल बंदी मात्र रॉकेल मिश्रित बायोडीजल विक्रीचा प्रकार उघडकीस येणे हे विषय सखोल चौकशीचा भाग नाही का? या पंप चालकांना बायोडिझेलचा पुरवठा कोण व कसा करीत होता या दिशेने गंभीरता पूर्वक तपास होणे, झुलेलाल बायोडिझेल पंप भाड्याची जागा घेऊन गुप्त पद्धतीने चालणे, यासाठी भाड्या ने घेतलेली जागा कोणाची ? परवानग्या नसून स्वतःच्या समरी पावर मध्ये किंवा कोणाचे आशिर्वादाने थेट पंप टाकले व अवैधरित्या बायोडिझेलची विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? या पंप चालकांना आवश्यक कागदपत्र सादर करणे कामी उशिरामाफी, मुदतवाढ व मुबा देण्यामागचे कारण काय? सर्व प्रकार यंत्रणेला अहवान वाटत नाही का? याबाबत तालुका पातळीची व स्थानिक यंत्रणा अनभिज्ञ नसून डोळेझाकच्या भूमिकेत का होती व आहे? सदरीचा गैरकारभार उघडकीस आल्यावरही पुन्हा रावेर ते जळगांवच्या महसूल अधिकाऱ्यांची भूमिका त्यांची कर्तव्यदक्षतावर प्रश्नचिन्ह? असून याचे बोलके सत्य असे की अद्यापि कारवाईबाबत त्यांच्याकडून तत्परता न दाखवणे व धूर्तराष्ट्र सारखी भूमिका घेणे बरेच काही सांगून जात आहे. म्हणून लवकरात लवकर आता काही जागृत नागरिक याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार देणार खात्रीलायक माहिती हाती आली आहे.सबब हे सर्व प्रश्न आता जास्त वेळ अनुत्तरीत स्थितीमध्ये राहणार नाही हे मात्र खरे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button