sawada

बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा थेट यंत्रणेला आव्हान : मात्र अद्याप सावदा येथील पंप मालकांवर गुन्हा दाखल नाही…!

बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा थेट यंत्रणेला आव्हान : मात्र अद्याप सावदा येथील पंप मालकांवर गुन्हा दाखल नाही…!

ठळक मुद्दे

अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी घेतली धृतराष्ट्राची भूमिका.

एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटूनही सदरील पंप चालकांवर गुन्हा दाखल नाही.

यंत्रणाची कुचकामी भूमिकांमुळेच बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा करणारे मोकाट.

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील बहुचर्चित बायोडिझेलचे पंप टाकून अवैधरित्या विक्रीचा गोरखधंदा आणि गेल्या आठवड्यात रावेर पोलिसांनी राज्यात रॉकेल बंदी असताना रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री करणारे दोन जणांना ताब्यात घेऊनऊन थेट त्यांच्यापासून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करून केलेली धडक कारवाई कौतुकास्पद आहे. तसेच यानंतर सावदा येथील बायोडिझेलच्या पावत्या असलेल्या वाहनास पकडून संबंधित महसूल विभागात याची माहिती दिली असता वाहन चालकांची चौकशी करून कोणतीही कारवाई न करता वाहनास सोडून दिल्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे.

यानंतर सावदा येथील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपित पद्धतीने अवैधरित्या भाड्याने घेतलेली जागेवर झुलेलाल बायो डिझेल पंप टाकून बिनदिक्कतपणे विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू होता यासंदर्भात पोलीस टाईम न्युज यांनी बातम्या प्रसिद्ध केल्याने सदरचा बायो डिझेल पंप सील करण्यात आला. मात्र सावदा येथे रावेर रोडवर महेंद्र धाबा समोर सुरु असलेला बायोडिझेल पंप बाबत अद्याप कोणतीच कारवाई संबंधित यंत्रणांकडून करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून याप्रकरणी ठोस कारवाई कोण कधी व कशी करणार हा एक गहन प्रश्न आहे.

उलट सदरील बायोडिझेल विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करणे संदर्भात पोलीस विभाग महसूल विभाग यांच्यात देखील जुंपली असे चित्र बघून. सावदा येथील बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा करणारी पंप चालक मालक आजही मोकाट फिरत आहे.

जिल्ह्यात बायोडिझेलची साठवणूक, विक्री, उत्पन्न, करणेबाबत परवानगी नसल्याने सदरील प्रकार चालत असल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ प्रमाणे कारवाई करणेकामी सक्तीची सूचना दि. १६ जुलै रोजी पासून जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी दिली असून याची अधिकृत माहिती असताना संबंधित अधिकारी कारवाई न करता पंप मालकांना आवश्यक कागदपत्र कामी उशिरा माफी मुदतवाढ का देत आहे? सावद्यात दुसऱ्या पंपाला अद्याप सिल न करण्यामागचे कारण काय? अवैध बायोडिझेल विक्रीप्रकरणी कारवाई करण्यास स्थानिक संबंधित सरकारी यंत्रणेत संथगती मागचे कारण काय? उघडपणे कायद्याचा कोणताच धाक न बाळगता स्वतःच्या समरी पावर मध्ये परवानगी न घेता पंप टाकून बायोडिझेलची बिनदिक्कत विक्रीचा गोरख धंदा संबंधित सरकारी यंत्रणेला थेट आव्हान वाटत नाही का? असे बोलके यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक दिवसापासून बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा शहरात अधिकाऱ्यांसह सर्वांचे वर्दळीचा रोडावर संबंधित स्थानिक यंत्रणेच्या नाकाखाली सहज सुरू असणे शक्यच नाही. कारण की सदरील प्रकरण उघड झाल्या नंतरही अद्याप ठोस कारवाई अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर न होणे बरेच काही सांगून जाते. अशी उघडपणे चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button