Bollywood

Bigg Boss 15: मराठमोळ्या तेजस्वी ने जिंकला बिग बॉस चा किताब आणि भली मोठी रक्कम

Bigg Boss 15: मराठमोळ्या तेजस्वी ने जिंकला बिग बॉस चा किताब आणि भली मोठी रक्कम

मुंबई १२१ दिवस चाललेल्या बिग बॉस १५ या रिऍलिटी शोचा फिनाले काल संपन्न झाला. तेजस्वी प्रकाश ने बिग बॉस 15 ची ट्रॉफी आपल्या नावे करून घेतली आहे. तेजस्वीच्या जिंकण्यामुळे चाहत्यांना अतिशय आनंद झाला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या जिंकण्याचा आनंद व्यक्त केला आहे.
तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस 15’ विजेती ठरली असून तिला ट्रॉफीसोबत रोख रक्कम देखील मिळाली आहे. अभिनेत्रीला ४० लाख रुपये रोख रक्कम मिळाली आहे.
तेजस्वी प्रकाशसोबत टॉप ३ मध्ये करण कुंद्रा आणि प्रतिक सहजपाल आहे. मात्र करण कुंद्रा टॉप २ मध्ये न येता आऊट झाला आहे. प्रतिक सहजपाल पहिला रनरअप आणि करण कुंद्रा दुसरा रनरअप ठरला आहे.

तेजस्वी प्रकाशचा खेळ पहिल्यापासूनच प्रेक्षकांना खूप आवडला होता. तेजस्वीची शोमध्ये अनेक लोकांशी मैत्रीही झाली होती, तर एका स्पर्धकासोबत सर्वात मोठी हाणामारी झाली होती. ही खेळाडू दुसरी कोणी नसून शमिता शेट्टी होती. शोमध्ये तेजस्वी आणि शमिता कधीही एका पिचवर दिसल्या नाहीत. दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण पाहायला मिळाले. बिग बॉस 15 च्या 29 जानेवारीच्या ग्रँड फिनालेमध्येही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button