मोठा वाघोदा

मोठा वाघोदा लोकनियुक्त सरपंच यांची उद्या ६ आक्टोंबर ला जिल्हाधिकारीं कार्यालयात सुनावणी..

मोठा वाघोदा लोकनियुक्त सरपंच यांची उद्या ६ आक्टोंबर ला जिल्हाधिकारीं कार्यालयात सुनावणी..

प्रतिनिधी/ भिमराव कोचुरे

मोठा वाघोदा सरपंच यांनी मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्य मुबारक अली तडवी यांनी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकारी जळगांव यांनी लोकनियुक्त सरपंचांना नोटीस बजावली असून दि.१९/०६/२०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी निश्चित करण्यात आली होती मात्र कोविड १९ चां प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याकारणाने उक्त सुनावणी घेण्यात आली नव्हती सदर प्रकरणी उद्या दि ६/१०/२०२० आक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी जळगांव कार्यालयात निश्चित करण्यात आली आहे व सरपंच.मुकेश रामदास तावडे यांना आवश्यक त्या कागदपत्री पुराव्यासह उपस्थित रहावे तसेच वरील दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपले काही एक म्हणने नाही असे गृहित धरून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही नोटीशीत नमुद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button