Nashik

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केदा नाना आहेर यांना गोदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केदा नाना आहेर यांना गोदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात

विजय कानडे नाशिक

नाशिक : नाईन न्यूज वृत्तवाहिनीच्या 13 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरीणांना गोदा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारामुळे पाठीवर शाबासकीची थाप पडल्याने सामाजिक कार्याला पाठबळ मिळाल्याचे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संजय राऊत यांनी यावेळी काढले.
कालिदास कलामंदिर मध्ये शनिवारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होते. खासदार राऊत म्हणाले, पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करणाऱ्यांना विशेष ऊर्जा मिळाली. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले ,कोरोना काळात अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला त्यांच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, स्थायी समिती सभापती गणेश गीते, जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, बांधकाम व्यवसायिक ललित रुंगठा, प्रेम कारडा, माजी नगरसेवक अमोल जाधव कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठा,सकाळचे बातमीदार विक्रांत मते, आज तक चे ब्युरो चीफ कमलेश सुतार, आरटीओ अधिकारी उत्तम जाधव,चांदवड चे माजी नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, शिक्षण क्षेत्र अंकिता पारख, उद्योजक इन्‍द्रपाल चड्डा यांना गोदा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, एचपीसीएल चे मुख्य क्षेत्रीय प्रबंधक प्रलय जांभुळकर, जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, शिरीन पाटील, क्षमा देशपांडे तसेच आय एम ए सदस्यांच्या वतीने डॉक्टर आवेश पलोड ,मंगेश चव्हाण ,आदींचा सत्कार करण्यात आला, यावेळी कृषी मंत्री दादा भुसे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ,शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी ,आमदार,सुहास कांदे नरेंद्र दराडे , नितीन पवार, माजी आमदार वसंत गिते ,माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,दत्ताजी गायकवाड महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते ,राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कोंडाजी आव्हाड, , शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, रमेश धोंगडे ,प्रशांत दिवे, संगीता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. नाईन न्यूज चे संचालक किशोर बेलसरे यांनी प्रास्ताविक केली तर अशोक कुटे व चिराग शर्मा यांनी स्वागत केले यावेळी नाईन न्यूजच्या संपादकीय विभाग सुनीता चौहान ,ताबरेज शेख आदि उपस्तीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button