Rawer

भाजपा पदाधिकारी सह मोठा वाघोदा ग्रामपंचायतीची सां.बा कार्यालयात धडक २ दिवसांत सावदा- रावेर रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन- राहुल पाटील

भाजपा पदाधिकारी सह मोठा वाघोदा ग्रामपंचायतीची सां.बा कार्यालयात धडक २ दिवसांत सावदा- रावेर रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन- राहुल पाटील

मुबारक तडवी रावेर

रावेर : बुऱ्हाणपूर अंकलेश्र्वर हायवे वरील सावदा ते रावेर दरम्यान पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांसंबंधी आज सावदा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आय.बी. शेख साहेब यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी चागलेच धारेवर धरले गेली अनेक दिवसांपासून सावदा रावेर दरम्यान रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्यांमुळे आज पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात यातील अनेक अपघातांमधे अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे व त्यांचा संसार उद्धवस्त झालेला आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी मस्कावद सिम येथील महिलेचा आपल्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना याच खड्डयांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला वारंवार तक्रार करून ही सार्वजनिक बांधकाम विभाग नाकर्तेपणामुळे नाहक लोकांचे जीव जात असून याचा जाब विचारण्यासाठी आज राहुल भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात सावदा येथे जाऊन शेख साहेबांना जाब विचारण्यात आला व जळगाव येथील मुख्य कार्यकारी अभियंता सौ. गिरासे मॅडम यांचेशी राहुल पाटील यांनी दुरध्वनी वरुन यासंबधी तक्रार केली व लवकरात लवकर खड्डे बुजण्यात यावे व रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी केली २ दिवसांत सावदा रावेर रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास सां बा सावदा विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देताच मुख्यकार्यकारी अभियंता गीरासे मॅडम यांनी येत्या दोन दिवसात खड्डे बुजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे यावेळी भाजपा पदाधिकारी राहुल पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय माळी, वाघोदा सरपंच मुबारक (राजू) अलिखा तडवी,उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी,गोकुळ महाजन,विशाल पाटील,बाळु काकडे,मुरलीधर महाजन,स्वप्नील पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button