Maharashtra

क्रिकेटर शिखर धवनला मोठा धक्का..!पहा गेल्या 24 तासांत दुसरा मोठा धक्का..!

क्रिकेटर शिखर धवनला मोठा धक्का..!पहा गेल्या 24 तासांत दुसरा मोठा धक्का..!

मुंबई टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये काही नावे घेण्यात आली आहेत तर काहींना टीममधून डच्चू देण्यात आला आहे. आर. तब्बल चार वर्षांनी आर अश्विन च पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याला मात्र मोठा धक्का बसला आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममधून धवनला डच्चू देण्यात आला आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवनला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला, तर वनडे सीरिज भारताने जिंकली होती.टीमचं नेतृत्व केलेल्या खेळाडूलाच वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये न निवडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शिखर धवनला मागच्या 24 तासांमध्ये बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. शिखर धवनचा आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाल्याचं वृत्त आलं. खुद्द आयशा मुखर्जीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची एक इमोशनल पोस्ट शेयर केली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button