Delhi

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उद्धवस्त..! 6 दहशतवादी अटकेत..! ISI चे एजंट..!एटीएस ची मोठी कामगिरी..!

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उद्धवस्त..! 6 दहशतवादी अटकेत..! ISI चे एजंट..!एटीएस ची मोठी कामगिरी..!

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत सणांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. ह्या दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आल आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचीही देखील माहिती मिळाली आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. त्यासाठी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमविण्यात येत होता.ह्या सर्व घातपाताची माहिती दिल्ली पोलीस विशेष विभागाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

सणांच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्याचा कट

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

एक संशयित महाराष्ट्रातुन अटक

दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये माहाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलंय. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button