Amalner

? Big Breaking…अमळनेर येथील खरे कोरोना योद्धा कर्तव्य बजावून देखील दुर्लक्षित…हक्काच्या मानधनासाठी केली जातेय प्रशासनाकडून टोलवा टोलव…

? Big Breaking…खरे कोरोना योद्धा कर्तव्य बजावून देखील दुर्लक्षित…हक्काच्या मानधनासाठी केली जातेय प्रशासनाकडून टोलवा टोलव…

अमळनेर येथील कोरोना योद्धा श्री.प्रविण डंबेलकर व श्री.प्रसाद चौधरी कोरोना काळात लढणारे योद्धे

हातावर पोट चालेल अशी यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना व परिवाराची जबाबदारी असा एकत्र परिवार, कोरोना सारखा जीवघेणा विषाणू जगात थैमान घालत होता. प्रविण व प्रसाद यांनी आपली उप-जीविका चालावी म्हणून कोणतेही संकट झेलण्यासाठी तयार होते त्यात प्रताप कॉलेज येथे रात्र पाळीला गेल्या १४ वर्षा पासून हे रोजंदारीने काम करीत होते, याकाळात लॉकडाऊन मुळे कॉलेज बंद झाले त्यामुळे मोठे संकट डोळ्यासमोर उभे होते, पण प्रताप कॉलेज येथे कोविड सेंटर आल्यामुळे येथील हॉस्टेलची संपूर्ण माहिती यांना असल्यामुळे यांना प्रांतधिकारी मॅडम यांच्या कडून पत्र मिळाले की आपली कोविड केयर सेन्टर ला पाणी पुरवठा, लाईट सुरू करणे व बंद करणे, पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेणे याकरिता आपली दि.११/०५/२०२०. दोघांची नियुक्ती करण्यात आली.सरकारी पत्र असल्यामुळे न घाबरता हे दोघेही कामाला लागले. सेवा भावी वृत्ती असल्याने एक महिना भर काम केले.

प्रांतां कडे पगारा साठी विनवण्या…

एक महिना काम केल्यानंतर पगार मिळावा म्हणून दोघांनी प्राचार्य, प्रताप कॉलेज यांच्या कडे आपला पगार घेण्यासाठी गेले.पण त्यांना उत्तर मिळाले कि तुम्ही कोविड केयरला काम करीत आहात तुम्हाला पत्र ज्यांनी दिले त्यांचा कडून पगार घ्यावा. त्यामुळे त्यांनी प्रांत-अधिकारी यांच्या कडे धाव घेतली.परंतु प्रांत मॅडम यांनी BMC येथील श्री.राजपूत साहेब यांच्या कडे पाठवले, त्यांना वारंवार भेटण्यास गेले असता त्यांची भेट झाली नाही.तरीही त्यांनी काम सुरु ठेवले. अश्या च स्थितीत ६७ दिवस काम त्यांनी केले पण पगार काही हातात आला नाही.

उपासमारीची वेळ

कोविड सेंटरला काम करत असल्यामुळे बाहेर काम करणे शक्य नव्हते, घरात दोन महिन्यापासून पगार नाही उपास मार होत होती त्यामुळे त्यांनी 17 जुलाई 2020 रोजी एक दिवस काम बंद केले. कोविड सेन्टरचे पाणी व दिवे एक दिवस बंद झाले प्रशासन जागे झाले दुसऱ्या दिवशी यांना श्री.साहेबराव दादा पाटील यांच्या कडून ५०००/- व BMC कडून १५,०००/- रुपयांची रक्कम देण्यात आली व सांगण्यात आले कि दोघेही दि. १८/०७/२०२० पासून पुढील २८ दिवस काम करतील व त्यांनी आपली सेवांची जबाबदारी पार पडली.

आणि हाती पडले काम बंद चे पत्र…33 दिवस उशिरा..

या दोघांना दि. ०१/०७/२०२० रोजी यांनी सेवा थांबवावी असे लिखित पत्र दि.०३/०८/२०२० रोजी कॉलेज च्या ऑफिस मध्ये प्रांत अधिकारी यांनी या दोघांच्या नावे दिले, सदर चे पत्र कॉलेज चे प्रमुख लिपिक यांच्या कडून मिळाले. सदर पत्र हे ३३ दिवस उशिरा देण्यात आले, यामागील कारण काय… ?

हा आहे कामांचा हिशोब…

या दोघांनी ऐकूण प्रति ९५ दिवस काम केले. ३५०/- रुपये याप्रमाणे ९५ दिवस ३५०/- रुपय = ३३,२५०/- रुपयाची रक्कम पगार स्वरूपात मिळायला हवी होती पण सदर त्यांना प्रति १०,०००/- रुपये देण्यात आले,
३३,२५० – १०,००० = २३,२५०/- प्रति रक्कम बाकी आहे. कृपया यांचा श्रमाचा पैसा यांना मिळावा, हि विनंती.
शासनाचे कोरोना योद्धा कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला याबद्दल शासनाचे आभार… अनेक पुरस्कार देण्यात आले पण या सामन्य सेवेकऱ्यांचे काय ..? ज्यांनी दोन महिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणताही प्रकारचा विमा हमी नसताना, मानव सेवा केली यांना न्याय देणार कोण …. ?

ताबडतोब मिळावा मोबदला…

या वैतिरिक्त दोघांचे धाडसी वृत्तीचे कार्य खालील प्रमाणे
१) सर्प मित्र असल्याने कोविड केयर सेंटर ला विषारी मणियार जातीचा सर्प पकडला.
२) काही त्राहासलेले रुग्णानी नळ तोडणे, लाईट फोडणे, बेसिंग चोकअप करणे इ. अनेक प्रकारचे नुकसान कारक कृत केले … या सर्व बाबी यांनी पुर्वरत केल्यामुळे वापरास सोय झाली.
३) गरजू रुग्णांना वस्तू व लहान बालकांना खाद्यपदार्थ पुरविले. इ.
४) डॉक्टर व नर्स यांच्या टेबल व खुर्ची सोय करणे.
५) पोलीस व होमगार्डस यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.
६) श्रीमंत प्रताप शेठजी व यांच्या श्रीमती असे दोन पुतळे आवारात आहेत यांची नित्य पूजा व साफसफाई यांनी केली त्याबद्दल खा.शी मंडळ चे कर्मचारी किंवा अधिकारी यांनी मोबदला द्यावा यासाठी नाही.
इ. लहान मोठ्या स्वरूपाच्या सेवा दिल्यात.
खंत – या कालावधीत दोघांना फक्त ३ P.P.E KIT देण्यात आले.

माहिती संकलन मदत आशिष चौधरी…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button