Amalner

? Big Breaking..अमळनेर येथील भुयारी गटारी..! पंपिंग स्टेशनचे नियोजन ?भुयारी गटारीचे पाईप दिड फूट आवश्यक..टाकले अर्धा फूट…जनता विचारते प्रश्न..

Big Breaking..अमळनेर येथील भुयारी गटारी..! पंपिंग स्टेशनचे नियोजन ?भुयारी गटारीचे पाईप दिड फूट आवश्यक..टाकले अर्धा फूट…जनता विचारते प्रश्न..

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे सध्या भुयारी गटारींचे काम सुरू आहे. हे काम जीवन प्राधिकरण कडे वर्ग आहे.परंतु अमळनेर नगरपरिषदेची यातली लुडबुड काही केल्या थांबत नाही. सध्या सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामात प्रचंड घोळ आणि भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणपणे मुख्य गावातून जाणाऱ्या ह्या भुयारी गटारींमधील पाइप ची साईज वेगवेगळी असते.त्यात साधारणपणे एक फुटा पासून आवश्यकतेनुसार दोन फुटा पर्यंत पाईप टाकणे आवश्यक आहे. जळगांव येथील भुयारी गटार योजनेतील कामात देखील दिड फुटाचे पाईप वापरण्यात आले आहेत. अमळनेर येथे मात्र सर्वच ठिकाणी अर्धा फुटाचे पाईप टाकले जात आहेत असे निदर्शनास आले आहे. याबाबत जनता संभ्रमात असून अनेक नियम धाब्यावर बसविले गेल्याची चर्चा गावात सुरू आहे.ह्या सर्व योजनेत पंपिंग स्टेशन कुठे असणार आहे? याचा उलगडा होत नाही. याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.त्याच प्रमाणे या योजनेत पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था आहे का? असेल तर पावसाळ्यात वीज मोठ्या प्रमाणात जाते मग वीज गेल्यानंतर काय प्रयोजन आहे का? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. गटार फक्त सांड पाण्याचीच आहे का? की पावसाचे पाणी देखील यातून निचरा होणार आहे? याबद्दल खुलासा करणे आवश्यक आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे भुयारी गटार प्राधिकरण कडे वर्ग असताना नगरविकास मंत्र्यां कडे 7 कोटींची मागणी करून 2 कोटी मंजूर देखील झाले आहेत..! मग आता नेमकं भुयारी गटारीत कोणतं राजकारण वाहत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button