Nashik

?Big Breaking… नाशिक मध्ये गोटू वाघ नावाचा नवा “तेलगी” ..कोट्यवधीचा घोटाळा..!यंत्रणा हादरली..!

?Big Breaking… नाशिक मध्ये गोटू वाघ नावाचा नवा “तेलगी” ..कोट्यवधीचा घोटाळा..!

मुंबई : नाशिकमध्ये स्टॅंमपेपरचा तेलगी घोटाळा २००० साला आधी झाला होता. सुरुवातीला या घोटाळ्याची व्याप्ती कमी वाटत होती, पण नंतर राज्यभरात तो पसरल्याचे आणि कोट्यावधींचा स्टॅमपेपर घोटाळा उघडकीस आला होता. आता पुन्हा गोटू वाघ नावाचा नवा तेलगी नाशिकमध्येच निर्माण झाला असून जुनी खेरदीखत काढून त्या आधारे कोट्यावधींच्या मालमत्या आपल्या व इतरांच्या नावावर केल्या जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधीमंडळात २९३ च्या प्रस्तावावर चर्चा करतांना देवेंद्र फडणवीस यांनी वीस – एकवीस वर्षा पुर्वीच्या तेलगी घोटाळ्याची आठवण करून देत त्याचा प्रकारचा मोठा घोटाळा पु्न्हा एकदा नाशिकमध्ये झाल्याचा आरोप केला . फडणवीस म्हणाले , गोटू वाघ नवाचा दुय्यम निबंधक हा खऱ्या अर्थाने या घोटाळ्याचा सुत्रधार आहे . मुद्रांक शुल्क कार्यालयातून जुन्या खरेदी खताच्या प्रत काढून त्यावर सत्यप्रत असे शिक्के मारले जात आहेत . खरेदी खतावरील क्रमांक कायम ठेवून त्यात फेरबदल करून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता या गोटू वाघने स्वतः व इतरांच्या नावे केल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनूसार आतापर्यंत ५० हजाराहून अधिक खरेदी खतांचा वापर करून अशा प्रकारच्या मालमत्ता हडपण्यात आल्या आहेत . यात मुद्रांक अधिकारी देखील सहभागी असून आॅनलाईन दुरस्त्या करून कोट्यावधींची संपत्ती विकली जात आहे . हा नवा तेलगी घोटाळा असून याची कसून चौकशी केल्यास यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही , असे सांगत या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी केली .
राज्यात महसुल – पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमाताने राज्यात वाळु माफिया निर्माण झाल्याचा आरोप करतांनाच अपसेट प्राईज वाढवून टेंडर घेण्यासाठी कुणीच येणार नाही अशी परिस्थिती जाणूबुजून निर्माण केली जात आहे . मग टेंडर आले नाही म्हणत खाजगी बोली लावून लागेल तेवढी वाळू माफियांच्या घशात घातली जात आहे . हा सगळा प्रकार थांबवून राज्याचा बुडणार महसूल वाचवण्यासाठी रेती घाट तात्काळ सुरू करा , अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button