Jalgaon

नामदार गिरिशभाऊ महाजन, खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा विराट होणार..

नामदार गिरिशभाऊ महाजन, खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

लाखांच्या संख्येने मतदार सहभागी होतील.

मनोज भोसले
जळगाव — आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा तेरा तारखेला सकाळी दहा वाजता जळगाव येथील विमानतळाच्या समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वांना ऐकता यावेत. यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असून या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक बंधू भगिनींना उपस्थित राहणार आहेत. आज यासाठी नामदार गिरीशभाऊ महाजन, खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जी एम फाउंडेशन च्या प्रांगणात आज गुरुवार सायंकाळी सात वाजता संपन्न झाली. ही सभा युतीची असून भाजप शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयारी करायची असून लाखो खुर्च्यांची व्यवस्था असून एक लाख लोक बसतील एवढ्या क्षमतेचे पेंडोल टाकण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पाहण्यासाठी , विचार ऐकण्यासाठी लाखों जनता येणार असल्याने विशेष पासेस दिल्या जाणार आहे.मोठ्या जल्लोषात स्वागत आणि विजयाच्या संकल्प केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली . याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सांगितले की
ही सभा सर्वात विराट सभा व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. ही सभा विराट अन् रेकॉर्ड ब्रेक ठरावी आणि यशस्वी करावी याकरिता कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी सर्वांनीच मेहनत घ्यावी असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील. महापौर सीमाताई भोळे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल, गटनेते भगत बालाणी, आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस दिपकराव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक विशाल त्रिपाठी यांनी केले. आढावा बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार चंदुलाल पटेल यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button