Amalner

? Big Breaking..मंत्री येती गावा… घाई घाईने रस्ते सुधरवा….महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना विनंती सहा महिन्यात गावागावात मारा फेरी…

मंत्री येती गावा…घाई घाईने रस्ते सुधरवा….महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना विनंती सहा महिन्यात गावागावात मारा फेरी...साधू संत येती घरा..तोचि दिवाळी दसरा…!प्रा जयश्री दाभाडेअमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमळनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व रस्ते खराब झालेले आहेत. विशेष म्हणजे असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डे नाहीत.अनेक तक्रारी अर्ज,विनंत्या करूनही अमळनेर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांच्या अंगावर रस्त्यांचे काम ढकलून गेल्या वर्ष भरा पासून नागरिकांचे हाल याची देही याची डोळा पहात आहेत. विशेष म्हणजे पत्रकारांनी या बाबतीत अनेक बातम्या देखील प्रकाशित केल्या की जेणे करून निद्रिस्त प्रशासनाला जाग येईल पण निगरगठ्ठ गेंड्याची कातडी पांघरलेल्या नगरपरिषदेला मात्र काही केल्या जाग आली नाही आणि नागरिकांची कीव ही आली नाही.आता मात्र अमळनेर पोलीस निवासस्थानांचे उद्दघाटन करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी मा मंत्री महोदय गृहमंत्री येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे खाते देखील आहे.आता झोपलेल्या प्रशासनाला मंत्री महोदयांना दाखविण्यासाठी रस्ते चांगले करणे भाग आहे… जनता गेली भाड मध्ये ..! त्यांचे हक्क अधिकार, आरोग्य याच्याशी प्रशासनाला काही घेणं देणं नाही..त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना विनंती आहे की बाबांनो जनते साठी विकास कामे होत नाही पण आपण जर अश्याच चार सहा महिन्यात दौरे केले तर तुमच्या येण्याने लोकांना सुविधा तरी मिळतील म्हणून दर चार सहा महिन्यांनी आपण दौरे करावेत..!फक्त राजकीय आणि प्रशासकीय सेवा करणारेच माणसे आहेत बाकी तर काय देशात जनावरेच राहतात..यात आता काही शंका राहिलेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button