Delhi

?Big Breaking..निवडणूक आयोगाचा मोदींना झटका..!पेट्रोल पंप वरील सर्व फलक हटविण्याचे आदेश..!

?Big Breaking..निवडणूक आयोगाचा मोदींना झटका..!पेट्रोल पंप वरील सर्व फलक हटविण्याचे आदेश..!

दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिला आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने करोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

पेट्रोल पंपांवर केंद्र सरकारच्या योजनांच्या जाहिरातींचे बॅनर लावलेले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. पण ज्या राज्यात विधानसभेची निवडणूक आहे, अशा राज्यात पंतप्रधानांच्या फोटोचा वापर सरकारी योजनांच्या बॅनरवर करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या पेट्रोल पंपांवरील असे बॅनर येत्या ७२ तासांमध्ये काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

याच बरोबर अजून एका वादाला तोंड फुटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मार्चला दिल्‍लीतील एम्‍स दवाखान्यात कोरोना लस घेतली होती. लस घेतलेल्या व्यक्तीला जे प्रमाणपत्र दिले जाते त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे.त्याखाली हिंदी व इंग्रजीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश व त्यासोबत त्यांचा फोटो आहे. मोदी यांच्या या फोटावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.हे चुकीचे असल्याचा आक्षेप तृणमूल कांग्रेस (TMC)ने घेतला आहे आणि याचा विरोध केला आहे.
तृणमूलच्या नेत्यांनी बुधवारी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने काही मुद्दे मांडत सरकारी बॅनरचा विरोध केला. यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या नेत्यांनी केली. या प्रतिनिधिमंडळातील ममता सरकारचे मंत्री फरहाद हाकिम यांनी, हा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग असल्याची टीका केंद्र सरकारवर केली. त्यावरुन निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button