Pune

?Big Breaking… आर्मी पेपर लीक प्रकरण ; 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक…एकूण 7 जणांना अटक

?Big Breaking… आर्मी पेपर लीक प्रकरण .. 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक…एकूण 7 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी मोठी कारवाई केली. वानवडी परिसरात कारवाई करत दोन लष्कर कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना पकडले आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

किशोर महादेव गिरी (वय 40, रा. लकडे नगर, माळेगाव, बारामती), माधव शेषराव गित्ते (वय 38) या दोघांना अटक केली. तर गोपाळ युवराज कोळी (वय 31) व उदय दत्तू आवटी (वय 23) या चौघांना अटक केली आहे. तर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अली अख्तरखान (वय 47), आझाद लालमोहम्मद खान (वय 37) आणि महिंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37) या तिघांना अटक केली आहे.
पुण्यासह देशभरात 40 केंद्रावर रिलेशन आर्मी शिपाई भरती परीक्षा होणार होती. या परीक्षेला 30 हजार विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा 28 फेब्रुवारी राजी होणार होती. मात्र आर्मीच्या गुप्तचर विभागाला मिळाली की, काहिजण ही प्रश्नपत्रिका फोडत ती व्हाट्सअपच्या माध्यमातून विविध सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना विकणार आहेत. लष्कराच्या विभागाने ही माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिली. त्यानुसार मग कारवाई करण्यासाठी गुप्ता यांनी वेगवेगळी पथके तयार केली. यानुसार मग विश्रांतवाडी येथे एका लॉजवर छापा टाकला आणि काहीजणांना पकडले. तर खंडणी विरोधी पथकाने वानवडी परिसरात छापा टाकत कारवाई केली आहे. त्यानुसार चौघांना पकडण्यात आले आहे. त्यात दोन लष्कर कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी विश्रांतवाडी येथे पोलिसांनी छापा करत कारवाई केली होती.

तर गिरी हा सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुख आहे. त्याच्याकडे ही प्रश्न पत्रिका येणार होती व तो ती सर्वत्र देणार होता. दरम्यान कोळी हा ट्रेनिंग बटालीयन 2 मध्ये कवायत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर उदय आवटी हा रेजिमेंटल पोलीस म्हणून कार्यरत आहे. विश्रांतवाडी परिसरात तसेच गुन्हे शाखेने वानवडीत केलेल्या कारवाईत पडताळणी केली जात आहे. त्या दोघांची काही संपर्क आहे का हे तपासले जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, पांडुरंग वांजळे, प्रवीण रजपूत, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने ही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button