Amalner

? Big Breaking….आनोरे गावाला राष्ट्रीय पातळीवर मिळाले बक्षीस मेहनत गावाची.. फुकटचे श्रेय घेतात अधिकारी ..राजकारण्यांप्रमाणे आता तालुक्यात अधिकाऱ्यांना श्रेयवादाची हौस..जाणून घ्या सत्यता…

आनोरे गावाला राष्ट्रीय पातळीवर मिळाले बक्षीस मेहनत गावाची.. फुकटचे श्रेय घेतात अधिकारी ..राजकारण्यांप्रमाणे आता तालुक्यात अधिकाऱ्यांना श्रेयवादाची हौस..प्रा जयश्री दाभाडेअमळनेर येथील आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे.केंद्रीय जल आयोगाकडे खुशाल पाटील आणि खंडागळे सर यांनी प्रस्ताव सादर केला होता.त्याची दखल घेत भूजल वैज्ञानिक केंद्रीय जल आयोग नागपूरऑफिस येथून अधिरा आर मॅडम ह्या गावाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी सर्वेक्षण करून केंद्रीय जल आयोगाला गावाची माहिती सादर केली होती.या नंतर दिल्ली येथून जल मंत्रालयच्या सिंघल मॅडम यांनी प्रस्तावावर दिलेल्या भ्रमणध्वनी व व्हाट्सअप द्वारे खुशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला .. व गजेंद्र सिंग शेखावत केंद्रीय जल मंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन 11 नोव्हेंबर 2020 रोजी पुरस्कार वितरण होईल व ऑनलाइन ग्रामस्थांशी संवाद साधतील तसेच पुरस्काराबद्दलचा आभाराचा 10 सेकंदाचा व्हिडीओ दिला जाईल अशी माहिती ग्रामस्थांना दिली आहे.हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे गावाने पाणी फाउंडेशन च्या 2019 च्या वाटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जल बचत करून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला होता.उत्तर महाराष्ट्रात आनोरे हे पहिलेच एकमेव पुरस्कार विजेते गाव होते.विशेष म्हणजे शेत शिवरतील पाणी अडविण्याबरोबरच घराचे सांड पाणी जमीनीत मुरवून गटार मुक्त गाव केले आहे. तसेच माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळ दौऱ्यात भेट दिली असता ग्रामस्थांनी छताचे पावसाचे पाणी संकलित करणे बाबत मा दादांशी चर्चा केली असता मा चंद्रकांत पाटील यांनी 16 लाख रुपये रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी लागणारे साहित्य आणि 6 लाख रु डिझेल साठी तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. तसेच अनेक दात्यांनी ही गावाला मदत केली आहे शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था व पत्रकार बांधव यांनी ही मोलाची मदत केली आहे या अनुषंगाने 100 % रेन वॉटर बचत करणारे हे गाव ठरले असून राष्ट्रीय पातळीवर गावाची नोंद घेतली आहे. आणि गावकऱ्यांच्या मेहनत आणि एकजुटी मुळे सदर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.पाणी बचती मुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून आर्थिक समृद्धी कडे वेगाने वाटचाल झाली आहे.या संदर्भात सातत्याने संदीप पाटील,तुकाराम पाटील,बाजीराव पाटील, खुशाल पाटील,खंडागळे सर,नरेंद्र पाटील,साहेबराव महाराज,विजय पाटील,अंबु पाटील,योगराज पाटील,रायचंद पाटील,सुनील पाटील,दादा भाऊ पाटील,योगेश पाटील,निलेश पाटील,दत्ता पेंटर,भाऊसाहेब पाटील,शेनपडू पाटील,शरद पाटील, अमोल पाटील,किशोर पाटील,दिलीप पाटील,सागर पाटील,शांताराम पाटील,विठ्ठल मिस्त्री आणि समस्त गावकऱ्यांनी मेहनत घेतली आहे.

आनोरे गावाच्या ह्या यशस्वीते चा लेखा जोखा माजी जि प सदस्य मा संदीप पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून दिला आहे. गावाची मेहनत आणि एकजुटी चे हे फलित असून दिवस रात्र केलेल्या मेहनतीचे फळ आहे.इतर गावानी आनोरे गावाचा आदर्श घेऊन जल बचत करत आपापले गाव समृद्ध करावे ही अपेक्षा या निमित्ताने संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button