Amalner

?Big Breaking.. इतिहासा बरोबरच धार्मिक ठिकाण ही जमीनदोस्त…जेसीबी वर दगड फेक…

?Big Breaking.. इतिहासा बरोबरच धार्मिक ठिकाण ही जमीनदोस्त….जेसीबी वर दगड फेक..

अमळनेर येथील जुन्या ऐतिहासिक दरवाजाला पाडून रस्ता मोकळा करण्याचे काम रात्रीच्या अंधारातही सुरू आहे. आज रात्री 10 वाजेच्या सुमारास दरवाज्याचा बुरुज पडण्याचे काम सुरू असताना जेसीबीवर 10 ते 12 तरुणांनी दगडफेक केली. या सर्व प्रकारात जेसीबीचा काच फुटला असून काम काही वेळा पुरते स्थगित करण्यात आले होते. पोलिस येताच तरुणांनी पळ काढलयाची घटना घडली आहे.
नगरपरिषदेने ऐतिहासिक दरवाजा पाडण्यासाठी तत्परता दाखवत काल पासून दरवाजा पाडणे सुरू केले होते.आज जेसीबी
मशीन दगडी दरवाज्याजवळ उभे असताना 10 ते 12 तरुणांनी जेसीबी वर दगडफेक
सुरू केली. नागरिकांनी पोलिसांना
कळवले असता पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,पोलीस नाईक शरद पाटील ,रवी पाटील तात्काळ पोहचल्याने तरुणांनी पळ काढला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button