Bollywood

Big Boss 15: असे 100 सलमान खान गल्लीत झाडू मारायला ठेवेन..अभिजित बिचकुले घराबाहेर येताच संतापले..!

Big Boss 15: असे 100 सलमान खान गल्लीत झाडू मारायला ठेवेन..अभिजित बिचकुले घराबाहेर येताच संतापले..!

मुंबई बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकले यांनी बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.

बिग बॉसचा 15 वा सिझन माझ्यामुळे चालला

सलमानला वाटतं की तो शो चालवतो पण तसं नाहीये. बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला. काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता. आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. ‘सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवर निशाणा साधलाय. ‘सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, असंही ते म्हणालेत.

पत्रकार परिषदेत करणार खुलासा

हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन, असं बिचुकले म्हणाले. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अभिजीत बिचुकले हे याआधी मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी केलेली विधानं चर्चेत होती. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सध्या ते बिगबॉस हिंदीमध्ये सहभागी झाले होते. नुकतेच ते बिगबॉसच्या घराबाहेर पडले आहेत. आता त्यांनी बिग बॉसचं घर आणि सलमान खानवर आरोप केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button