World

?Big Breaking.. आता गरज नाही ट्रू कॉलर ची..गुगलने आणले नवीन फिचर…

?Big Breaking.. आता गरज नाही ट्रू कॉलर ची..गुगलने आणले नवीन फिचर…

प्रा जयश्री दाभाडे

जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन कंपनी गुगलने नुकतच Verified Calls या नव्या फिचरची घोषणा केली आहे. गुगलच्या ह्या नवीन फिचर मुळे TrueCaller ह्या अ‍ॅपला थेट टक्कर देणार आहे. गुगलच्या नवीन सुविधे द्वारे कोण कॉल करतंय, कॉल करणाऱ्या व्यक्ती च्या प्रोफाइलचा लोगो इ ची माहिती यूजर ला मिळेल. त्याच प्रमाणे बिजनेस कॉल का करण्यात आलाय याचं कारणही युजर्सला कॉल रिसिव्ह करण्या पूर्वीच समजेल.

जगभरात फ्रॉड आणि स्पॅम कॉल्स येण्याची समस्या युजर्स ला त्रास दायक ठरत आहे आणि या पार्श्वभूमीवर गुगलने Verified Calls फीचर प्रचलनात आणलं आहे. हे फीचर सुरुवातीला भारत, स्पेन, ब्राझिल, मेक्सिको आणि अमेरिका इ देशांसह जगभरात सुरू केलं जाणार आहे. गुगलच्या पिक्सेल साखळीच्या सर्व फोनमध्ये आणि प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये Google Phone अ‍ॅप पूर्वी पासूनच डायलर म्हणून काम करत आहे. त्या सर्व फोनमध्ये हे फीचर पुढील अपडेटपासून मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अ‍ॅप इंस्टॉल नसेल तर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून इंस्टॉल करु शकतात.आणि या सुविधेचा लाभ युजर्स घेऊ शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button