sawada

सावदा न.पा. हद्दवाढीत समाविष्ट गौसियानगर सह विविध भागात नविन गटारी व रस्त्यांचे भूमिपूजन…

सावदा न.पा. हद्दवाढीत समाविष्ट गौसियानगर सह विविध भागात नविन गटारी व रस्त्यांचे भूमिपूजन…

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात न.पा. हद्दीत समाविष्ट झालेले गौसिया नगर, ताजुशशरिया नगर, मदिना नगर इत्यादी भागात जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून गटारी व रस्त्यांची मोठी समस्या होती दर पावसाळ्यात येथील रहिवासी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत होती सदर भागातील सर्वत्र ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलेला असतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यात वादळी वाऱ्यामुळे आलेल्या घानकचऱ्यातून विषारी डांस, मच्छरांचा विविध प्रकारचे किडे कट कुल यांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत होती नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता या गंभीर समस्यांला येथील रहिवाशांना सतत तोंड द्यावे लागत होते यासंदर्भात वेळोवेळी येथील नागरिकांनी सामूहिक रित्या पालिका प्रशासन सह राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, यांच्याकडे समस्या चा निवारण करण्यासाठी मागणी केलेल्या होत्या व आहे.

सदरील सर्व विभागाची समस्या कायमची संपवण्या करिता सतत पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचे हरहुन्नरी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी कागदोपत्री पाठपुरावा केल्याने सदरील सर्व भागात आज दिनांक १८ जुन २०२१ रोजी नवीन रस्ते व गटारी करिता भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कामात माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी चे सावदा येथील जेष्ठ नेते राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी,तसेच नगरसेविका नंदाताई लोखंडे व सध्या पालिकेत लाभलेले मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांनी सहकार्य केले याबाबत येथील परिसरातील नागरिकांनी आनंदी होऊन त्यांचे आभार मानले

सदरच्या कार्यक्रमात सुरवातीला लोकनियुक्त नगराध्यक्षा आनिता पंकज येवले यांच्या शुभहस्ते भुमीपुजन करण्यात आले नंतर माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका नंदाताई लोखंडे सह सर्व सत्ताधारी नगरसेवक व नगरसेविका यांनी कूदाली मारली यावेळी नगरसेविका सगीरा बी सैय्यद तुकडू, रंजना जितेंद्र भारंबे,करूणा पाटील,जयक्षी नेहते, लिना चौधरी, नगरसेवक विश्वास चौधरी, सत्ताधारी गटनेते अजय भारंबे, अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष सहीत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अकबर खान अमानुल्ला खान, समाज सेवक शेख निसार शेख नबी, अल्लारखा, शौकत खान, शेख शब्बीर, हुसैन भाई चाय वाले, कमालुद्दीन जनाब, कृ.उ.बा. समिती सदस्य सैय्यद अजगर, असलम जनाब इत्यादी मान्यवर उपस्थिती होती. तसेच सदर कार्यक्रम ठिकाणी अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचीसुद्धा विशेष उपस्थिती होती

यानंतर विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी या नवीन वसाहती मध्ये रस्ते व गटारी साठी विरोधी गटनेते फिरोज खान पठाण यांच्या प्रयत्नामुळे सदर काम कसा मार्गी लागला यासाठी कोण कुणाचे सहकार्य लाभले यासंदर्भात माहिती दिली तसेच पंधरा वर्षाच्या कालावधीत हा संवेदनशील विषय कसा मार्गी लागला यासाठी काय करावे लागले याबाबत नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी सविस्तर माहिती देताना असे सांगितले की पालिकेतील फक्त प्रोटोकॉल प्रमाणे सदर कार्यक्रमात नगराध्यक्ष सह सर्वसत्ताधारी हे सामील झाले याला म्हणतात “उंगली काटकर शहीदो मे मिलना” असा खोचक टोला हि लागवला तसेच पाच वर्षाच्या कालखंडात प्रथमच सत्ताधारी नगराध्यक्षा व त्यांचे सर्व नगरसेवक, नगरसेविका या भागात नागरिकांना दिसले शेवटी माझ्या व येथील रहिवासी नागरिकांच्या मागणीला महत्त्व देऊन हा प्रश्न सुटला आता लवकरच हा काम सुरू व्हावा अशी अपील करून अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष यांनी नगरसेवक राजेश वानखेडे व विरोधी गटनेते फिरोज खान पठाण यांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button