Latur

ऑक्सीजन व रेमडीसीवर इंजेक्शन व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णाचा दवाखान्यात मृत्यू झाल्यास डॉ ,स्थानिक आमदार ,खासदार ,महापौर ,जिल्हाधिकारी तहसीलदार याचे वर मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार भिम आर्मी जिल्हा प्रमुख विलास चक्रे लातुर

ऑक्सीजन व रेमडीसीवर इंजेक्शन व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णाचा दवाखान्यात मृत्यू झाल्यास डॉ ,स्थानिक आमदार ,खासदार ,महापौर ,जिल्हाधिकारी तहसीलदार याचे वर मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार भिम आर्मी जिल्हा प्रमुख विलास चक्रे लातुर
लक्ष्मण कांबळे लातूर
लातूर : सध्या देशात कोरोना संसर्गजन्य विषानुणे थैमान घातलेले आहे,या महामारीतून आपला जीव कसं वाचवता येईल ,भितीपोटी जनता सरकार जे निर्बंध लादत आहे, नियमाच्या अधीन राहूनचं सरकारला सहकार्य करत असताना पहावयास मिळत आहे, सरकारने निर्बंध घातलेत हे निर्बंध मात्र सर्व सामान्य जनतेच्या बोकांडी बसलेत , सर्व सामान्य जनतेच्या विकासाच्या अपेक्षा घेऊन निवडणुकीच्या काळात मत मागायला येणारे नेते मंडळी मात्र स्वतः जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण भोळ्याभाबड्या जनतेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ,आपल्या स्वच्छ पाणी आरोग्य सुविधा मूलभूत गरजांची सोय करून देतील म्हणून या जनतेनी मतदान देऊन निवडून दिले, आहे पण गेल्या वर्षी पासून म्हणजेच कोरोनाचा संसर्ग वाढल्या पासून आज पर्यंत एक ही नेता हा मतदाराच्या घरा पर्यंत ऐवून विचार पूस केली नाही , म्हणून जिल्हातील गोरगरीब जनताही प्रशासन व्यवस्थेवर व मतदाराच्या मतावर निवडणूक आलेले सर्व स्थानिक मंडळींवर जनता नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत,मत घेऊन निवडून आलेल्या नेत्यांनी कोरोना रुग्णाला रुग्णालयात जाऊन ऑक्सीजन रेमडीसीवर इंजेक्शन मिळत आहेत का त्यांना व्हॅटिलेटर बेड मिळत आहेत का याची स्वतः जातीने जाऊन चौकशी करणे गरजेचे असताना ,नेते मंडळी मात्र स्वतःचा व कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, त्या मुळे नेते मंडळी व प्रशासन व्यवस्थने कोरोना पेशंटला वाचवण्यासाठी ही असाच प्रयत्न करावा नाहीतर ,कोरोना रुग्णाला दवाखान्यात ऑक्सीजन रेमडीसीवर इंजेक्शन व्हॅटिलेटर बेड अभावी रुग्णाचा दवाखान्यात मृत्यू झाल्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार जिल्हाधिकारी ,आदी प्रशासकीय अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असे भिम आर्मीचे लातुर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे यांनी प्रसार माध्यशी बोलताना माहिती दिली
लॉक डाऊन मुळे सर्व सामान्य जनतेच्या हातातले कामे गेली या मुळे आर्थिक अडचण निर्मान झाली, महागाईने तर कळसच गाठला आहे , किराणा दुकानदार मात्र चढ्या भावाने विक्री करत जनतेला राज रोष पणे लुटत आहे, जनतेची सरकारला विनंती आहे की मास्क, सॅनिटाइझर, हात धुण्यासाठी साबण ,लॉक डाऊन जो पर्यंत आहे तो पर्यंत घरात जीवनावश्यक वस्तूचा साठा पुरवणे , तसेच जर एखाद्या व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर त्याचा खर्च जनतेनी निवडून दिलेल्या सर्व सदस्यांनी त्याच्या फंडातून कोरोना पेशंटचा खर्च करावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button