Amalner

भिलाली बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबवण्याचे काम सुरू माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून कामास सुरवात भिलाली,आंबपिंप्री,बहादरपूर,महाळपूर,कंकराज व इतर गावांना होणार फायदा

भिलाली बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबवण्याचे काम सुरू माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून कामास सुरवात भिलाली,आंबपिंप्री,बहादरपूर,महाळपूर,कंकराज व इतर गावांना होणार फायदा

अमळनेर : बोरी नदीपात्रात तामसवाडी येथील धरणातून पाणी सोडले आहे.यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.मात्र भिलाली येथील बंधाऱ्याला गळती लागलेली असल्याने ग्रामस्थ चिंतेत होते, ऐन दुष्काळात पाण्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने गळती थांबवणे गरजेचे असल्याने सरपंच व ग्रामस्थांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन कामास सुरवात करण्याचे सांगितले.
अमळनेर मतदारसंघ ऐन दुष्काळाच्या छायेत असतांना बोरी नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले असल्यामुळे नदीकाठावरील गावांना याचा काहीप्रमाणात फायदा होणार आहे.बंधाऱ्याची गळती थांबवण्यासाठी लागणारे १५०० बारदान(गोणपाट) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ग्रामस्थांना दिले असून गळती थांबवण्यासाठी सोलापूर येथील ठेकेदार व कामगार मागवण्यात आले.या कामासाठी अपेक्षित सर्व खर्च माजी आमदार स्वतः उचलणार असून या कामासाठी जातीने लक्ष घालणार आहेत.पहिल्याच दिवशी गळती असलेले १२ गेट बंद करण्यात आलेले आहे.
या बंधाऱ्याला एकूण ५२ लहान गेट असून,प्रत्येक गेट ला थोड्याफार प्रमाणात गळती आहे गळतीमुळे जास्त काळ पाणी साचून राहत नाही.मागील वर्षी गळती बंद न झाल्यामुळे ३ महिन्यात केटीवेअर खाली झाला होता, या उन्हाळ्यात पाणी टंचाइ जाणवू नये यासाठी गळती थांबवणं गरजेचं आहे.
पूर्ण गेटची गळती बंद झाल्यास केटीवेअर मध्ये ३ किलोमीटर पर्यंत बॅकवॉटर राहू शकते व यामुळे परिसरातील भिलाली,कंकराज,अंबापिंप्री बहादरपूर,महाळपुर तसेच मंगरूळ, शिरूड या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या इंधन विहिरी येथील काठावर असल्याने त्यांना देखील फायदा होऊ शकतो.
सोलापूर येथील सूर्यवंशी ठेकेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन श्रीधर मोरे,बबलू पावरा यांच्या माध्यमातून सोलापूर येथील पाणबुडे गळती थांबवण्याच काम करत आहेत.सरपंच बेबाबाई पाटील,उपसरपंच भीमाबाई कोळी,सदस्य आस्तिक पाटील,सुभाष पाटील,विश्वास भिल,मंगलबाई रवींद्र,विजय शिवाजी तसेच ग्रामस्थांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.या कामासाठी अमळनेर येथील बरदान चे व्यापारी सुधाकर सुपडू वाणी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button