यावल

भवानी साँमीलच्या दप्तरातून सागवानी मालाचे बोगस पास.

भवानी साँमीलच्या दप्तरातून सागवानी मालाचे बोगस पास.

महसूल व वनविभाग प्रधान वन सचिवाकडे तक्रार

वनविभागतिल 7 अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी.

सुरेश पाटील

यावल दिनांक 10 ता.प्र.
भुसावल येथील भवानी सांमीलच्या दप्तरातून सागवानी मालाचे बोगस पास तयार करून सागवानी लाकडाच्या चौकटी व सागवानी फडके इत्यादी इत्यादी माल निर्गमित करून यावल पश्चिम वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांच्या गावी संगमनेर येथे रवाना केल्याने संबंधित वनविभातील 7 अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर शाखा धुळे वनवृत्त चे अध्यक्ष अशोक टी. तायडे रा. फैजपुर तालुका यावल यांनी केली आहे.
दिनांक 6 /12 /2019 रोजी महसूल व वनविभागाचे प्रधान वन सचिव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आगार रक्षक भुसावल व त्याच्या कामात सहकार्य करणारे ( 1) उपवन संरक्षक, जळगाव वनविभाग जळगाव दिगंबर पगार, 2 )विभागीय वनअधिकारी दक्षता जळगाव उमेश वावरे, 2 ) तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक अतिरिक्त दसरे, 3) अतिरिक्त तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक दसरे, 4) उपवनसंरक्षक यावल वन विभाग यावल पी.टी.मोराणकर, 5 ) मुक्ताईनगर चे वनपरिक्षेत्र अधिकारी बच्छाव, 6) यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, 7 ) भुसावल आगार रक्षक विजय माळी यांनी वरील साथ अधिकारी-कर्मचारी यांनी आपापल्या कार्यकाळात वेळोवेळी संगनमत करून भुसावल येथील भवानी स्वामीलच्या दप्तरातून सागवानी लाकडाच्या चौकटी व सागवानी फडके हा सागवानी माल भवानी स्वामील मधील असल्याचा भासवून भुसावल आगार रक्षक विजय माळी यांनी परवाना क्रमांक 0082464 दिनांक 4/1/2019 रोजी गाड़ी क्रमांक MH-19- CY- 0537 निर्गमित केली. ( सागवान माल रवाना केला ) सदरचा सागवान माल चौकटी व फडके हे यावल येथील सागवान तस्कर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून घेऊन सागवान माल यावल पश्चिम वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांच्या गांवी म्हणजे संगमनेर येथे रवाना केलेला आहे, याप्रमाणे अनेक पासेस वर इतर ठिकाणी पासेस वर सागवानी माल निर्गमित केला आहे आणि या सर्व गैरकृत्य मागे वरील सर्व वनविभागाचे 7 अधिकारी व कर्मचारी संगनमताने सहभागी असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करून सदरची चौकशी सी.सी.एफ. अथवा उपसचिव या दर्जाच्या अधिकारीवर्गा मार्फत नि:पक्षपातीपणे करावी व शासनाचे झालेले आर्थिक नुकसान व्याजासह वरील वनविभागाचे 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी अशी लेखी तक्रार महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर, शाखा धुळे, वनवृत्ताच्या चे अध्यक्ष अशोक टी. तायडे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button