Nashik

भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव तर सरचिटणीसपदी दीपक गरुड यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव तर सरचिटणीसपदी दीपक गरुड यांची निवड

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=येवला तालुका मुक्तीभूमी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेची येवला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक येवला मुक्तीभुमी येथे नुकतीच संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल हे होते. येवला तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव यांची तर सरचिटणीसपदी दीपक गरुड यांची निवड करण्यात आली. बैठकीला येवला तालुक्यातील अनेक पदाधिकारी धम्म बंधू आणि भगिनी हे प्रामुख्याने उपस्थित होते. निवड प्रक्रियेच्या अगोदर येवला तालुक्यातील मागील दोन वर्षाचा कार्य अहवाल, जमा खर्च अहवाल, धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांच्या संदर्भात झालेला खर्च या बाबतीत सविस्तर चर्चा सदरील बैठकीत करण्यात आली कार्यकारणी निवड प्रक्रियेमध्ये संस्कार विभागाचे सचिव कृष्णाजी सोनवणे निफाडचे भाऊलाल कटारे हे प्रामुख्याने सहभागी होते. सर्वानुमते निवड प्रक्रियेच्या अगोदर फॉर्म वाटप करण्यात येऊन फॉर्म परिपूर्ण भरून त्यामधील माहितीच्या आधारे योग्य पद्धतीने निकष लावून येवला तालुक्यातील 21 पैकी सतरा पदांची घोषणा
परीपूर्णपणे कार्यवाही करून कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सरचिटणीस दीपक गरुड कोषाध्यक्ष रामभाऊ केदारे उपाध्यक्ष संस्कार विभाग – प्रभाकर गायकवाड
उपाध्यक्ष पर्यटन विभाग- वाल्मीक झाल्टे
उपाध्यक्ष संरक्षण विभाग – विनोद त्रिभुवन
कार्यालयीन सचिव -रवींद्र सोनवणे
ऑडिटर -शिवाजी देवराम जाधव
संस्कार विभागाचे सचिव पोपट खडांगळे, महिला विभागाच्या सचिव रंजनाताई पठारे, शांताबाई झाल्टे, पर्यटन विभागाचे सचिव मच्छिंद्र झाल्टे, विलास भाऊ अहिरे
तर संघटकपदी राम सुरेश कोळगे, सोपान फकीरा अहिरे, बाळू गायकवाड, बाबुराव पगारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया संपन्न झाली निवड प्रक्रियेच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्प पूजा करण्यात येऊन मेणबत्ती अगरबत्तीचे प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गरुड यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा शाखेचे संस्कार विभागाचे सचिव कृष्णाजी सोनवणे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button