Mukatainagar

भरत शिरसाठ सर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

भरत शिरसाठ सर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरच्या वतीने सन 2021- 22 चा राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण चे मुख्याध्यापक तथा साहित्यिक भरत शिरसाठ सर यांना औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी सौ अंजली धानोरकर यांनी दि.5 सप्टेंबर रोजी फेसबुक वरून ऑनलाइन जाहीर केला. भरत शिरसाठ सर यांनी अनेक प्रशिक्षणामध्ये जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर मास्टर ट्रेनर म्हणून काम केले आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक या ठिकाणी दोन वर्ष विभागीय इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

त्यांची मराठी व इंग्रजीत एकूण पाच पुस्तके प्रकाशित आहेत. चेस प्रोजेक्ट मध्ये त्यांनी जिल्हा एम.इ.आर म्हणून काम केले आहे. सेतु अभ्यासक्रमांमध्ये कन्टेन्ट निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यात इयत्ता 4थी करिता एम.इ.आर. म्हणून त्यांनी काम केले आहे. जळगाव जिल्हा व्ही- स्कूल प्रोजेक्ट मध्ये इंग्रजी विषय प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत.

जळगाव जिल्हा इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘शिक्षक कसा असावा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे ते लेखक आहेत. वृत्तपत्रांमधून त्यांचे कथा, कविता व प्रासंगिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. इंडिया बांगलादेश टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्टचे ते जिल्ह्याचे समन्वयक होते. एससीइआरटी च्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी 2021 मोडेल निर्मितीमध्ये ते सदस्य आहेत. ग्रामीण शिक्षण विकास संघटन, एक भारत श्रेष्ठ भारत, समतावादी साहित्य मंच, समता शिक्षक परिषद, सिविल राइट्स प्रोटेक्शन सेल अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते राज्यपातळीवर नेतृत्व करीत आहेत. चालू वर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून नामांकन मिळालेल्या तीन शिक्षकांमध्ये त्यांचा समावेश होता.

त्यांच्या निवडीबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापन सदस्य, उत्राण गावातील ग्रामस्थ व जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयातील शिक्षक वृंद, इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन चे पदाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Back to top button