Mumbai

सावधान…! पॉर्न पाहताय..सायबर पोलिसांचे तुमच्यावर आहे लक्ष..ही आहेत शिक्षेची कलमे..!पॉर्न सर्च मध्ये राज्यात ही 3 शहरे टॉपवर..

सावधान…! पॉर्न पाहताय..सायबर पोलिसांचे तुमच्यावर आहे लक्ष..ही आहेत शिक्षेची कलमे..!पॉर्न सर्च मध्ये राज्यात ही 3 शहरे टॉपवर..

भारत देशात 5 वर्षांपासून पॉर्न साइट्सवर बंदी आणण्यात आली आहे.साधारण पणे 850 पॉर्न साईट्स वर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक लोक गुपचूप कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं पॉर्न पाहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच 2020 मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार भारतातील सर्वात जास्त पॉर्नसाइट्स या महाराष्ट्रात पहिल्या जातात.त्यातल्या त्यात पुणे, नाशिक आणि नागपूर ह्या जिल्ह्यांमध्ये पॉर्न बघण्याचे सर्वात जास्त प्रमाण आहे. गुगल पॉर्न सर्चिंगमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा जास्त समावेश आहे. त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पुणे आणि नाशिक किंवा नागपूरचा क्रमांक आहे.

पहिल्या क्रमांकावर जे शहर आहे त्याचं नाव ऐकून अनेकांचे डोळे पांढरे होतील. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा पॉर्न साइट पाहण्यात पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे.

अश्लील फिल्म पाहणे आणि पॉर्न साइट्सना भेट देणार्‍यांची संख्या जवळजवळ चार पटीने वाढली दिसते. या पाहणाऱ्यांमध्ये आणि वापरकर्त्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन मुले आणि मुली, महिला आणि वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश आहे.

आता सायबर पोलिसांनी या नव्या ट्रेंडवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पॉर्न शोधण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 149अन्वये आयटी कायद्याच्या कलम (67 (ए, बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. त्यामुळे पॉर्न पाहणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button