Bollywood

हटके..!बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी स्पर्धकांना जावे लागले जंगलातून..!

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी स्पर्धकांना जावे लागले जंगलातून..!

मुंबई टीव्हीचा सर्वात मोठा रियॅलिटी शो बिग बॉस १५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सुरू असलेला बिग बॉस ओटीटी पूर्ण झाल्यानंतर, शोचे निर्माते बिग बॉसची टीव्ही आवृत्ती सुरू करतील. हा शो सुरू होण्याआधीच बिग बॉस १५ बद्दल चर्चा सुरू झाली आहे. या शोचे चाहते टीव्हीवर त्यांचा आवडता होस्ट सलमान खानला पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. याच दरम्यान शोच्या निर्मात्यांनी शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह त्यांच्या आवडत्या शोसाठी आणखी वाढतो आहे.

या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान जंगलात बिग बॉसचे घर शोधताना दिसत आहे. प्रोमोची सुरुवात रेखाच्या आवाजाने होते. जंगल पे दंगल..
स्पर्धकांना प्रवेशापूर्वी अनेक आव्हानांवर करावी लागेल मात!
शोचा प्रोमो व्हिडिओ पाहून हे स्पष्ट झाले आहे की, बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. बिग बॉस १५ या वेळी संकट आणि नवीन वळणांनी भरलेला असेल, तर दुसरीकडे, शोमध्ये एव्हरग्रीन रेखा यांच्या एन्ट्रीने चाहत्यांचा उत्साह द्विगुणित केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button