Baramati

बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प रखडला

बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प रखडला

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती- बारामती शहराच्या दृष्टीने महत्वकांक्षी 172 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प वर्षभरासाठी रखडला आहे. बारामतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित होणे गरजेचे असतानाही विविध तात्रिक बाबीसाठी हा प्रकल्प राखडल्याचे समोर येत आहे.
बारामतीतील चोऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे,प्रत्येक घटनांवर पोलिसांची बारकाईने नजर राहावी या उद्देशाने शहरात 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची महत्वकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती.दिवंगत खासदार डी. पी.त्रिपाठी यांनी त्यांच्या खासदारनिधीतून यासाठी 75 लाखांची रक्कम देऊ केली आहे. या प्रकल्पाला राज्यशासनाने मंजुरी दिली.हे काम अधिक परिपूर्ण व्हावे या दृष्टीने केपीएमजी या कंपनीकडून सर्व्हेक्षणही करून घेण्यात आले होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅमेऱ्याची रचना व्हावी व आगामी काळात वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन त्या दृष्टीने हा प्रकल्प व्हावा अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अपेक्षा आहे.
बारामती नगरपालिकेच्या संवेदनशील ठिकाणी पोलीस व नगरपालिका यांच्या समन्वयातून 172 ठिकाणी उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार होते.या पैकी 75 लाख त्रिपाठी यांनी दिले असून उर्वरित 59 लाख रुपये नगरपालिका देणार असे ठरले होते.नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचे कार्यक्षेत्र 54 स्क्वेअर किमी इतके व्यापक झाले.शहराचे वेगाने नागरीकरण झाल्याने दुचाकी चोरीसह इतरही काही अनुचित घटना घडत आहेत.वाहतुकीचे समन्वय करण्यासह इतरही बाबतीत सीसीटीव्ही शहरात असणे गरजेचे आहे.
1 कोटी 34 लाखाचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित होता मात्र नंतर यात काही बदल झाल्यामुळे हा खर्च वाढणार आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीची तरतूद करणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button