Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र: मॉर्निग वॉक आणि पती पत्नी वर भर रस्त्यात दरोडा..!

Amalner: चोऱ्यांचे सत्र: मॉर्निग वॉक आणि पती पत्नी वर भर रस्त्यात दरोडा..!

अमळनेर पती सोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस कार मधून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तिची 15 ग्रॅम सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आर के नगर जवळ घडली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की स्वामी समर्थ मंदिराजवळ राहणारे
दीपक मेडिकलचे मालक रामलाल बाबूलाल पाटील हे आपल्या पत्नी रंजनाबाई रामलाल पाटील यांच्या सोबत दररोज पहाटे धुळे रस्त्यावर नियमित पायी फिरायला जातात. दि 14 रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता ते दोघेही फिरायला निघाले
होते.पहाटेची वेळ आणि निर्मनुष्य रस्ता होता. आर के नगर जवळ सिल्व्हर रंगांची वॅगनार गाडी क्रं एम एच 09 एक्यू 1559 त्यांच्या जवळ थांबली. त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले चार जण खाली उतरले.हा प्रकार पाहून पतीपत्नी कमालीचे घाबरले होते. त्या चौघांपैकी एकाने चाकू काढून महिलेला धाक गळ्यातील सोन्याची पोत ओरबडली.यामुळे महिलेच्या मानेला थोडी जखमही झाली. यानंतर ते चोरटे पटकून वाहनात बसून धुळ्याकडे पसार झाले. सदर चोरट्यांकडे इतर हत्यारे देखील असल्याने नक्कीच ते मोठे दरोडेखोर असावे अशी खात्री त्यांची झाली होती. या घटनेने पतीपत्नी घाबरले असल्याने त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूला कुणीही नसल्याने ते हतबल होते, हा प्रकार सुरू असताना तेथे शेजारीच राहणारे माजी नगरसेवक राजेश पाटील यांना थोडा आवाज झाल्याने ते तेथे पोहोचले होते मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरीकडे घाबरलेले पत्नीपत्नी घरी आले.मुलाला सोबत घेत पहाटे 6 वाजताच त्यांनी पोलीस ठाण्यात ऑनलाइन तक्रार दाखल केली.

शहरात दोन दिवसांपूर्वी चोरट्यानी पिंपळे रोडवरून वॅगनार गाडी चोरी करून मुंदडा पार्क जवळील मानसी गिफ्ट्स अँड ज्वेलरी हे शॉप फोडून आठ ते नऊ लाखांचा माल लंपास केला होता. सदर चोरटे व ती गाडी सीसीटीव्ही कॅमरे व एका व्हिडीओ मध्ये कैद झाले होते, त्यानंतर कालच्या लुटीच्या घटनेनंतर काही सीसीटीव्ही तपासले असता तीच गाडी व तेच चोरटे दिसत असल्याने त्यांनीच ही लूट केल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button