Bollywood

बापरे शिल्पा शेट्टी झाली टकली..!जिम मधील व्हिडीओ व्हायरल..!

बापरे..! शिल्पा शेट्टी झाली टकली..!जिम मधील व्हिडीओ व्हायरल..!

मुंबई बॉलिवूडमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच तिचा पती राज कुंद्राची अटक सुटका ह्या विषयामुळे चर्चेत होती.तसे तर शिल्पा नेहमीच सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.ती फिटनेस आणि स्टाईल साठी नेहमीच चर्चेत आणि प्रेरणादायी असते.कायम तिच्या चाहत्यांना प्रेरणा देत असते. ती नेहमी तिच्या लूकवर विविध प्रयोग करत असते.तिचे कपडे,स्टाईल या चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असते.आता शिल्पा तिच्या हटके लूक मुळे सध्या चर्चेत आहे.

शिल्पाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ जिममधील असून वर्कआऊट सुरू करण्याआधी शिल्पा तिचे केस बांधताना दिसत आहे. त्यात तिचा नवीन हेअरकट दिसत आहे. शिल्पाने मानेच्यावरचे केस पूर्णपण काढून टाकले आहेत…

आणि व्हिडिओ शेअर करत शिल्पाने लिहिले आहे… ‘तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडू शकत नाहीत. मग ते अंडरकट बझकट (खरेच सांगते यासाठी खूप हिंमत लागते…) असो वा माझा नवीन एरोबिकचा वर्कआऊट…ट्रायबल स्क्वैट्स शिल्पाचा हा नवा हेअर कट चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या या अनोख्या हेअर कटवर युझर्सने खूप भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.इन्स्टाग्राम वर टिका आणि पसंती असा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत.
शिल्पाचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख ६२ हजाराहून अधिक युझर्सने लाईक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button