Mumbai

बापरे रे….!रिमोट कंट्रोलच्या मदतीने तब्बल 6 कोटींची वीज चोरी, वसईतील घटना

बापरे रे….!रिमोट कंट्रोलच्या मदतीने तब्बल 6 कोटींची वीज चोरी, वसईतील घटना

मुंबई वसई येथे तब्बल 6 कोटी रुपयांची विज चोरी झाल्याची घटना घडली आहे. एका कंपनीने तब्बल 6 कोटी 17 लाखांची वीज चोरी केल्याची घटना समोर आली आहे. वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनीने गेल्या 50 महिन्यात तब्बल 6 कोटी 17 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाच्या धाडीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे दोन भागीदार, जागामालक आणि वीजचोरीची यंत्रणा उभारून देणारा एकजण अशा 4 जणांविरूद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य कार्यालयाकडून ग्राहकाच्या वीज वापर विश्लेषणातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग तसंच मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वसईच्या कामन गाव परिसरातील अमाफ ग्लास टफ (गाळा क्रमांक एक, प्लॉट क्रमांक 3 व 4, युनिक इस्टेट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, आयेशा कंपाउंडजवळ, सर्वे क्रमांक 155) कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिर हुजेफा, जागेचे मालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारा अज्ञात व्यक्ती अशा चार जणांचा समावेश आहे.

भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार 674.76 किलोवॉट आढळला. तपासणी दरम्यान हकीमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रिमोट कंट्रोल आढळून आला. या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीजवापरात 90 टक्के घट होत असल्याचे पंचासमक्ष केलेल्या प्रात्यक्षिकात आढळून आले. तर रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्विच बोर्डमध्ये निळ्या, काळ्या व लाल टेपमध्ये लपवलेले निदर्शनास आले होते.
मीटरच्या बाहेरील बाजूस रिमोट कंट्रोल सर्किट बसवून व फेरफार करुन वीज वापरणे ही वीजचोरी ठरते याबाबत कल्पना दिल्यानंतर वीज वापरकर्त्यांनी वीजचोरी केल्याचे मान्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button