Jalgaon

बापरे चिंता वाढली..जळगावात डेल्टा प्लस चे 6 नवे रुग्ण..!

बापरे चिंता वाढली..जळगावात डेल्टा प्लस चे 6 नवे रुग्ण..!

जळगाव कोरोना लाटेतून महाराष्ट्र कसाबसा सावरला असताना आता आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण वाढायला लागले आहे. मुंबई, ठाणे, मराठवाड्यापाठोपाठ आता जळगावमध्ये (jalgaon) डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. जून महिन्यात महिन्यात 7 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा 6 रुग्ण आढळल्याने जळगाव जिल्ह्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जून महिन्यात आढळलेले 7 डेल्टा प्लसची रुग्ण हे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात आढळले होते.

आज नव्याने आढळलेले 6 रुग्णांमध्ये जळगाव महानगरपालिका क्षेत्रात 02, जामनेर तालुक्यात 03 व पारोळा तालुक्यात 01 अशा सहा रुग्णांचा समावेश असून आढळलेले सहा रुग्ण हे 17 ते 7 या वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button