India

आजपासुन चार दिवस बँका बंद..ATM मधून पैसे काढण्यासाठी देखील येऊ शकतो प्रॉब्लेम..

आजपासुन चार दिवस बँका बंद..ATM मधून पैसे काढण्यासाठी देखील येऊ शकतो प्रॉब्लेम..

बँका आज पासून म्हणजे 28 तारखे पासून 31 तारखे पर्यंत बंद असणार आहेत. त्यामुळे जर बँके संदर्भात काही महत्वाची कामे होणार नाहीत. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आज पासून सलग चार दिवस बँकेना सुट्टी असणार आहे.

आज चौथा शनिवारी आणि उद्या रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्याने 30 आणि 31 तारखेला देशाच्या विविध भागांत बँका बंद असतील. परंतु गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वच ठिकाणी बँकेला सुट्टी नसेल कारण ठराविक राज्यात बँक बंद असतील.

भारतातील अनेक राज्यांमध्ये कृष्णजन्म किंवा गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे 30 तारखेला अहमदाबाद, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद असतील. तर इतर राज्यांमध्ये 31 ऑगस्टला बँक बंद असेल.चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांना ATM मशीनमधून पैसे काढण्यासाठी देखील अडचण येऊ शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button