Nashik

बाणगंगातिरि रंगला “बाप्पा माझा लाडका “पुरस्कार सोहोळा !

बाणगंगातिरि रंगला “बाप्पा माझा लाडका “पुरस्कार सोहोळा !

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : जानोरी गावाचे भूमिपुत्र आणि चित्रकला क्षेत्रातील राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नामवंत चित्रकार सुभाष बाबुराव वाघ.यांनी आयोजित केलेल्या “बाप्पा माझा लाडका” चित्रस्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी 11 वाजता उस्फुर्त वातावरणात पार पडला.जानोरी गावातील पहिली ते दहावीच्या 163चित्रकार विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. श्री गणेशांची विविध आकारातील आणि रंगांतील नेत्रसुखद रूपं गावातील रसिक बंधू भगिनींना पहावयास मिळाली.चित्रप्रदर्शनास शाळेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी गर्दी केली होती.लहान गट प्रथम साई जाधव,द्वितीय वैष्णवी घुमरे, तृतिय श्रावणी वाघ.दुसरा गट प्रथम शंतनु काठे द्वितीय कृष्णा घुमरे, तृतिय समीक्षा काठे.मोठा गट प्रथम आदित्य वाघ,द्वितीय सानिया खोडे तृतिय अविनाश चित्ते. या विजेत्यांनी पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. जानोरी गावाच्या इतिहासात प्रथमच झालेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी चित्रकार सुभाष वाघ यांना मनापासून धन्यवाद दिले. ते पुढे आपलं कलादानाचं व्रत दर रविवारी चालू ठेवणार आहे! या सोहळ्यास प्रमुख पाहुणे मा. जि पी सदस्य प्रवीण(नाना) जाधव, विलास सर देशमुख, शंकरराव काठे, शंकरराव वाघ, गणेश तिडके, विष्णुपंत काठे, रेवचंद वाघ विधाते, राजकुमार वाघ, योगेश तिडके, हर्षल काठे, माणिक घुमरे, राजू अण्णा विधाते, बाबुराव बोस, ज्ञानेश्वर डवणे, किशोर विधाते, अरुण घुमरे, संदीप गुंजाळ, समाधान डगळे, अशोक केंग उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button