Amalner

अमळनेर तालुक्यातील बळीराजा भिडला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात..!जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आश्वासन..!

अमळनेर तालुक्यातील बळीराजा भिडला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात..!जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आश्वासन..!

अमळनेर तालुक्यातील पश्चिम-उत्तरेकडील भागात अत्यंत अत्यल्प तुरळक
कमी पर्जन्यमानामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने तीव्र दुष्काळ घोषित
करून पिकविमा भरपाई व दुष्काळी मदत ताबडतोब मिळणेबाबत…
अमळनेर तालुक्यातील पश्चिम-उत्तरेकडील
भागात मारवड मंडलमध्ये खरीप हंगाम 2021-2022 मध्ये माहे 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 पर्यंतच्या या अत्यंत महत्वाच्या पावसाळ्याच्या दोन महिन्यात जेमतेम फक्त आणि फक्त 48 मिमी तुरळक स्वरूपाचा खंडित तो पण रिमझिम असा अत्यल्प पाऊस पडला आहे. परिणामी संपूर्ण मारवड मंडलमध्ये कोरडवाहू क्षेत्रात सर्वच शेतकल्यांनी दुबार-तिबार वेळा खरीपाच्या पेरण्या / लागवड केल्यात अशा भयंकर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा जबरदस्त आर्थिक संकटात सापडला आहे. उपरोक्त पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून आपणास वास्तव परिस्थितीची तीव्र
दाहकता लक्षात येईलच आजच्या वास्तव परिस्थितीत ज्या काहीशा शेतांमध्ये थोडीफार उगवण झाली आहे. ती लहान रोपे (कोंब) अत्यल्प कमी अशा ओलाव्यामुळे कशीतरी कुपोषीत व निस्तेज अवस्थेत आहेत. दोन महिने महत्वाचे
पावसाळयाचे गेल्यामुळे आता जरी पाऊस पडला तरी या संपूर्ण भागाचा सर्वच खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे.

हे वास्तव सत्य आज कोणीच नाकारू शकणार नाही. अशा या अतिशय भयानक परिस्थितीमुळे शेतकरी राजा पूर्ण खचून व हतबल होवून गेला आहे.
कृपया आपण उपरोक्त वास्तव सत्य परिस्थितीची तीव्र दाहकता ओळखून आपण व सर्व संबंधीट अधिकारी वर्ग यांनी मारवड मंडलसह इतर तत्सम मंडलास प्रत्यक्ष भेट देवून प्रत्यक्षात वास्तव सत्य परिस्थितीची पाहणी करून मारवड मंडलसह इतर तत्सम मंडलांना तीव्र दुष्काळ घोषीत करावा व संबंधीत विमा अधिकाऱ्यांना पीक विमा पंचनामे करण्याचे आदेश देवून आम्हाला पीक विमा भरपाई 100 टक्के जोखीमस्तर (भरपाई) रक्कम मिळावी तसेच आपण महसूल विभागामार्फत सुध्दा स्पेशल स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून आम्हाला दुष्काळी मदत देखील ताबडतोब मिळाली पाहिजे याची आपण व्यक्तीगत दखल घ्यावी व आमचे लेखी म्हणणे (दुःख) सरकारी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयापर्यंत ताबडतोब कळविणे याचे कारण की, आमच्यासारख्या नुकसानग्रस्त अतिवृष्टीबाधीत 2019
शेतकऱ्यांना सत्यता असूनसुध्दा शासकीय मदत मिळण्यासाठी तब्बल दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागते ? कृपया आपण उपरोक्त सत्य परिस्थितीचे अवलोकन करून ताबडतोब कार्यवाही करावी असे निवेदन मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज जळगांव येथे देण्यात आले आहे.

निवेदन देण्यासाठी अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळ मधील गोवरधन बोरगाव मारवड खेडी वासरे डांगरी बोहरा पिंगळवडे निंभोरा अमळगाव येथील शेतकरी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. मा जिल्हाधिकारी यांनी मी स्वतः पाहणी करण्यासाठी येणार असून शेतकऱ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल असे आश्वासन बळी राजाला दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button