Pune

कोविड सेंटर मधील “फॅबीफ्ल्यू” गोळ्या चोरी करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन अधीक तीव्र करणार – बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा.

कोविड सेंटर मधील “फॅबीफ्ल्यू” गोळ्या चोरी करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन अधीक तीव्र करणार – बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शासकीय कोविड सेंटरमधून रुग्णांसाठी अत्यावश्यक व दुर्मिळ औषध असणारे फँबीफ्ल्यूच्या गोळ्या चोरीस गेलेले होते. त्या चोरीशी संबंधित असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करा अन्यथा अंदोलन अधीक तीव्र करू
असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे यांनी प्रशासनास दिला आहे.

याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे यांनी आंदोलन स्थळी गुरुवार ( दि. २२ ) रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बाबासाहेब भोंग, संजय कांबळे, नानासाहेब चव्हाण, अक्षय मखरे, गौस सय्यद, समीर मखरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत बोलताना अँड. राहुल मखरे म्हणाले की, या प्रकरणाच्या बाबतीत अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या होत्या. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे तोंडी आदेश तहसिलदार यांना दिले होते. परंतु संबंधित दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. निमगांव केतकीतील कोविड सेंटर येथे ( दि.१५ ऑक्टोबर ) पर्यंत १९० रुग्ण दाखल होते. तर ( दि. १० सप्टेंबर ) रोजी निमगाव केतकी कोविड सेंटरमध्ये शेवटचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी तेथे एकूण १४० रुग्ण दाखल होते. या आकड्याच्या आधारे हे स्पष्ट होत आहे की, निमगांव कोविड सेंटर येथील मृत्यूदर हा ८ टक्के आहे. या मृत्युदराचा विचार केल्यास जगामध्ये सर्वात वाईट व गंभीर परीस्थिती निमगाव केतकी कोविड सेंटरची आहे.

( दि. ६ ऑक्टोबर ) रोजी या कोविड सेंटरमधून ”फॅबीफ्ल्यु” च्या गोळ्या चोरीला गेल्याचे एका परिचारिकेच्या निदर्शनास आले होते व तिने चोरी करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना फोन करुन कोविडच्या रुग्णांना देण्यासाठीच्या दुर्मिळ व अत्यावश्यक गोळ्या आपण घेऊन गेलात, त्या लवकरात लवकर आणून द्या. अन्यथा माझी नोकरी जाईल असे सांगितले. भविष्यातील बचाव म्हणून त्या परिचारिकेने त्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले असावे. रुग्णांच्या जिविताशी खेळून गेळ्या चोरणे, चोरी करणाऱ्या डॉक्टरांना वाचवणे असा प्रकार जगात कुठेही घडत नसावा. तो प्रकार निमगावच्या कोविड सेंटरमध्ये घडला आहे.

यामध्ये चोरी करणारा डॉक्टर व त्यांना वाचवणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करुन दोषींवर चोरी व सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ज्या रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या नातेवाईकांना शासकडून २५ लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून, यासाठी बुधवार ( दि. २१ ऑक्टोबर ) पासून इंदापूर तहसिल कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button