Rawer

लग्नात बॅड वाजणार-पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

लग्नात बॅड वाजणार-पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

निंभोरा बु ता रावेर संदीप कोळी

येणाऱ्या लग्नसमारंभात बॅड वाजणार असे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगर चे आमदार श्री. चंद्रकांतभाऊ पाटील यांना सावदा ता रावेर येथे एका कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र बॅड कलाकार संघटनेचे रावेर यावल मुक्ताईनगर विभागीय पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन तसेच निवेदना द्वारे बॅड वाजवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली असता यावेळी शासनाने तुम्हाला बॅड वाजवण्याची परवानगी दिली असून याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करतो असे आश्वासन पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिले . यावेळी निवेदन महाराष्ट्र बँड कलाकार संघटनेचे रावेर यावल मुक्ताईनगर विभागीय संघटनेचे अध्यक्ष श्री.बबन बडगे , उपाध्यक्ष श्री.राजीव बोरसे,सरचिटणीस श्री.आतिश केदारे , रावेर ता अध्यक्ष श्री. निरज सोनवणे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष श्री.सुरेश भालेराव, यावल. ता.अध्यक्ष कालू मास्टर, सावदा शहर अध्यक्ष श्री.किशोर लोखंडे ,तसेच उमेश चौधरी, कमर मास्टर , विलास सपकाळे,भाऊसाहेब लोंढे,या सह आदींनी दिले. यावेळी बॅंड वाजवण्याची परवानगी दिल्या बद्दल सर्व महाराष्ट्र बॅंड कलाकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
—///——-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button