Faijpur

फैजपुर ते भुसावल रस्त्याची दुर्दशा

फैजपुर ते भुसावल रस्त्याची दुर्दशा

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

यावल तालुक्यातील फैजपूर आमोदा बामणोद पाडळसा दरम्यान नुकत्याच झालेल्या डांबरीकरण यावर झालेल्या दुरुस्तीचे काम एक ते दीड महिन्यातच जैसे थे झाल्याचे चिन्ह दिसत आहे गेल्या एक महिन्या पूर्वी या डांबरीकरणाची दुरुस्ती झाली होती दुरुस्ती होऊन सरासरी एक ते दीड महिना ही झाला नाही परिस्थिती जैसे थे झाली असून पुन्हा या डांबरीकरण मध्ये पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून फैजपूर येथून आमोदा बामणोद पाडळसा भुसावळ दरम्यान जळगाव कडे जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून नुकत्याच झालेल्या डांबरीकरण यावर दुरुस्तीचे काम एक ते दीड महिन्यातच या कामाचे तीन तेरा वाजून गेले असून गेल्या काही महिन्या पूर्वी यादरम्यान लहान मोठे अपघात झाले होते त्यामुळे मात्र गेल्या महिन्यात हे डांबरीकरण दुरुस्ती करण्यात आली होती मात्र पुन्हा यादरम्यान झालेल्या दुरुस्तीच्या कामात पुन्हा मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून रावेर लोकसभा व रावेर विधानसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेला फैजपूर आमोदा बामणोद पाडळसा दरम्यान भुसावळ व जळगाव कडे जाणाऱ्या या रस्त्याने अनेक लोकप्रतिनिधी चा वापर असताना त्यांनीसुद्धा याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी वाहनधारकांमध्ये आहे दिवाळीपासून एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचा चा संप सुरू असून मोठ्या प्रमाणात ॲपे रिक्षा रावेर सावदा फैजपूर आमोदा बामणोद पाडळसे भुसावळ मार्गे मोठ्या प्रमाणावर धावत आहे फैजपूर येथील रिक्षा मालक चालक अवेस शेख महमूद यांची भेट घेतली असता त्यांनी सुद्धा सांगितले की गेल्या महिन्यात रोड दुरुस्तीचे काम झाले परंतु पुन्हा या रस्त्याने मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे रिक्षाचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता आहे यावल बांधकाम अभियंता जहांगीर तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही दुरुस्ती चांगल्या पद्धतीने करतो परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे ज्या ठिकाणी दुरुस्ती होते त्याच्या पूर्वीच्या ठिकाणी खड्डे पडतात त्यामुळे आम्हाला सुद्धा अडचणी निर्माण होते परंतु या मार्गाची मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा निघणार आहे या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे चांगल्या पद्धतीने या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button