Aurangabad

अतिवृष्टी झाल्याने ओला जाहीर करुन आर्थिक मदत करावी.

अतिवृष्टी झाल्याने ओला जाहीर करुन आर्थिक मदत करावी.

औरंगाबाद :- गणेश ढेंबरे

औरंगाबाद / वैजापूर तालुक्यावर यंदा सततच्या पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना लवकरात-लवकर आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या अनुषंगाने सप्टेंबर अखेर महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या पंचनामे करून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडे ६३ कोटी ३ लक्ष ६० हजार ५०० रुपये इतकी मागणी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने तालुक्यात ६३ दिवस हजेरी लावल्याने ५०० मिलिमीटर वार्षिक सरासरी असलेल्या वैजापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याअखेर ८२५ मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या १६५ टक्के इतका पाऊस झाला. जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कृषी व महसूल विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये ८४ हजार ४३० हेक्टर जिरायत क्षेत्र, २ हजार ७०७ इतके बागायत क्षेत्र, फळबागेचे १ हजार ९४ हेक्टर असे एकूण ८८ हजार २३१ हेक्टर म्हणजेच पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ६९ टक्के इतके क्षेत्र बाधित झाले असल्याचे अहवालात कळविले आहे. जिरायती शेतीसाठी ६ हजार ८०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ८०० व फळबाग लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच्या मागणीसह बाधित क्षेत्रासाठी शासनाकडे ६३ कोटी ३ लक्ष ६० हजार ५०० रुपये इतकी मदतीची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय शेतकऱ्यांनीही खरिपाच्या वेगवेगळ्या पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून ८५ हजार २०५ हेक्टरसाठी विमा कंपनीकडे दोन लाख २८ हजार इतके अर्ज दाखल केले. विमा रकमेचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा अन्यथा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाला कॉल करावा. याशिवाय स्मार्ट फोनमधील अँपद्वारे झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील एक लाख ३६ हजार ४३ इतक्या पेरणी योग्य क्षेत्रापैकी यंदा एक लाख २८ हजार ५८४ हेक्टर इतक्या शेत जमिनीवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. यामध्ये कापूस – ७४,६८३ हेक्टर, मका -३३७६९
हेक्टर, बाजरी – ७१७६ हेक्टर, भुईमूग – २२८१ हेक्टर, सोयाबीन -८७६ हेक्टर, मूग – २८४५ हेक्टर, उडीद – ४० हेक्टर, तूर – १४१७ हेक्टर, ऊस – १३२४ हेक्टर, कडधान्य – ६९८, गळीत धान्य – ४२८ हेक्टर, इतर
तृणधान्य – १०५७ हेक्टर व भाजीपाला-१३९० हेक्टर अशी लागवड करण्यात आली आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button