Maharashtra

खेड तालुक्याच्या आदिवासी भागात आयुष प्रसाद यांच्या पाहणी दौरा

खेड तालुक्याच्या आदिवासी भागात आयुष प्रसाद यांच्या पाहणी दौरा

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने म्हणजे मंदोशी गावाची जावळेवाडी येथे रस्ता तुटून गेल्यामुळे गावचा संपर्क तुटलेला आहे. तसेच भोमाळे येथील डोंगर तुटून रस्त्यावर ढिगारा निर्माण झालेला आहे. आणि एकलहरे (गावठाण) या ठिकाणी डोंगराला तडा जाऊन २००ते२५० मी. चीर पडलेली आहे. व मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी केली. त्यावेळी गटविकास अधिकारी अजय जोशी साहेब, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश कानडे साहेब, बांधकाम विभागाचे जोशी साहेब कनिष्ठ अभियंता, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गायकवाड, पंचायत समिती विस्तार अधिकारी पी जी शिंदे साहेब, आदिवासी विभागाचे तालुका समन्वयक गणेश गावडे साहेब, सुधीर भोमाळे सरपंच, अजय आंबेकर सरपंच, गणेश आंबेकर ग्रामसेवक, तावरे साहेब ग्रामसेवक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button