Bollywood

“ह्या” मराठी अभिनेत्याला कर्करोगाचे निदान..उपचारासाठी इस्पितळात दाखल…

“ह्या” मराठी अभिनेत्याला कर्करोगाचे निदान..उपचारासाठी इस्पितळात दाखल…

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याने उपचारासाठी त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं.
दहा दिवसांपूर्वी महेश यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

महेश यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही नाव कमावलं आहे. ‘वॉन्टेड’,’रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘कांटे’ या चित्रपटात भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोबतच छोट्या पडद्यावर महेश ‘बिग बॉस मराठी’ चं सूत्रसंचालन करताना दिसले होते. लवकरच ते ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ चं सूत्रसंचालन करताना देखील दिसणार आहेत. यासोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने महेश यांनी ‘व्हाइट’ या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. याशिवाय महेश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ याचीही निर्मिती देखील करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button