Dhadgaon

पावरी भाषेतील ऑक्सिजन,मास्क,कोरोना लस, कोरोनावाला बाबा शॉर्ट फिल्म द्वारे जनजागृती

पावरी भाषेतील ऑक्सिजन,मास्क,कोरोना लस, कोरोनावाला बाबा शॉर्ट फिल्म द्वारे जनजागृती
धडगाव : ता.7 सध्या जगात करोनाने धुमाकूळ घातला असून अनेकांचे जीव डोळयांदेखत जाताना पाहतो आहे,त्यात कोणी कोरनाच्या भीतीने हार्टअटॅक ने तर कोणी ऑक्सिजन अभावी जीव देतांना पाहतो आहे,अशातच आदिवासी जनजागृती टीमच्या समाज तळमळीने आदिवासी पावरी बोली भाषेत ऑक्सिजन,मास्क,कोरोना लस,कोरोना वाला बाबा नावाच्या शॉर्ट फिल्म बनवून कोरोना रुग्ण दाखवून त्याची हालत, लक्षणे कोणती व लगेच कशापद्दतिने उपचार घ्यावेत व लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन कोणती चाचणी करून घ्यावी.या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून कोरोना रुग्णाची परिस्थिती दाखवून आदिवासी जनतेचे पावरी भाषेत या लघुपटाद्वारे प्रबोधन केले जात आहे. या लघुचित्रपटात अर्जुन पावरा, राकेश पावरा, कल्पेश पावरा, दिपक पावरा, किरण पावरा, वर्षा शेल्टे मुख्य भूमिकेत आहेत तर पडद्यामागे टीम मेंबर परिश्रम घेत आहेत.आदिवासी जनता ही कोविड लस घेतल्याने माणूस मरतो म्हणून अनेक अफवांना बळी पडत होती लसीकरणाच्या मुद्द्यावरून आदिवासी गावांमध्ये लसीकरणासाठी नकारात्मक सूर असल्याच्या पाड्यांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आदिवासी जनजागृती टीमने केला. तेव्हा आदिवासी पाड्यांवरही लसीकरणाबद्दल फारशी सकारात्मकता दिसली नाही.निसर्गाच्या सान्निध्यात, शहरापासून दूर असल्याने लसीकरण सध्या तरी नकोच, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली होती व लसीकरणा परिणामा बद्दल सुरु असलेल्या उलट सुलट चर्चा असो अशा वेगवेगळ्या बातम्यानी आदिवासी बांधव ग्रासलेला होता परंतू आदिवासी जनजागृती टीम ने खेडयापाडयात जाऊन सुशिक्षित तरुणांना मदतीला घेऊन ऑक्सिजन मास्क कोरोना लस कोरोना वाला बाबा पावरी फिल्म दाखवून लोकांतील लसीकरणा बाबतीत गैरसमज दूर करण्यात यशस्वी होतांना दिसताहेत त्याचेच फलित म्हणून आज आदिवासी समाजातील बांधव कोविड लस घेण्यासाठी स्वतःहुन आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण शिबीरात हजेरी लावून लस टोचून घेतांना दिसत आहे. आदिवासी जनजागृती टीम मागील 4 वर्षा पासून विविध सामाजिक मुद्यावर काम करत आहे. कोविड-19 महामारीत जनजागृतीवर आदिवासी जनजागृती टीम मागील वर्षापासून काम करत आहे या कामासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्धी मिळाली आहे सोशल मिडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचली आहे.
“ उलगलान फाऊंडेशनच्या अंतर्गत चालणारा हा प्रोजेक्ट मागच्या वर्षी देखील लॉकडाऊन मध्ये विडिओ बनून समाजात जनजागृती करत होती या कामासाठी आदिवासी जनजागृती टीमला राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती” असे मत उलगुलान फाऊंडेशनचे संस्थापक नितेश भारद्वाज यांनी माहिती दिली.
“2016 मध्ये सुरू झालेल्या या प्रोजेक्टने स्वच्छ भारत मिशनवर देखील समाजात जनजागृती करण्याचे काम केले होते त्या करिता पुरस्काराने सन्माननीत करण्यात आली” अशी माहीती फाऊंडेशनचे सह-संस्थापक राकेश पावरा यांनी दिली.
“ फाऊंडेशन आता पर्यंत 300 पेक्षा जास्त विडिओच्या माध्यमातून लाखों लोकांपर्यंत पोहचली असून दररोज नवीन सभासद जोडत आहे त्यामुळे कामाचा वेग वाढला असून नवनवीन मुद्याला स्पर्श करत जनजागृतीचे काम सुरू राहणार” अशी माहिती संस्थेचे सह-संस्थापक अर्जुन पावरा यांनी दिली.

Leave a Reply

Back to top button