Amalner

सनातन विद्या फाउंडेशन तर्फे ” तेजोवलंय”पुरस्कार प्रदान

सनातन विद्या फाउंडेशन तर्फे ” तेजोवलंय”पुरस्कार प्रदान

अमळनेर श्री सनातन विद्या फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा तेजोवलय राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ नुकताच संपन्न झाला, पौरोहित्य व ज्योतिष क्षेत्रात कार्य करतांना समाजाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो ,यंदाचे या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनातन चे जिल्हा अध्यक्ष श्री गोपाल जी जोशी होते तर प्रमुख वक्ते वेदमूर्ती देवेंद्र शास्त्री गढी कर होते ज्योतिष क्षेत्रातील कार्याबद्दल ज्योतिषाचार्य श्री उदय जी पाठक यांना तर पौरोहित्य क्षेत्रासाठी वेदमूर्ती वासुदेव शास्त्री एडके गुरुजी व वेदमूर्ती केशव शास्त्री पुराणिक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व मानपत्र देण्यात आले, प्रमुख वक्ते श्री गडीकर शास्त्री यांनी आपल्या ओघवत्या शैलीत वेदांच्या सहाही अंगांचा परिचय करून दिला, वेदांत व वेद यांची रचना समजावून दिली ,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे अध्यक्ष श्री नितीन जी भावे गुरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन श्री मंगेश काळकर यांनी केले मान्यवर व उपस्थितांचे आभार श्री शैलेश काळकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री व्यंकटेश कळवे अथर्व कुलकर्णी मयूर राव यांनी सहकार्य केले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button