Pandharpur

आवताडे गटाचा वैयक्तिक गाठीभेटींवर भर!

आवताडे गटाचा वैयक्तिक गाठीभेटींवर भर!

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघाला पुढार्यांच्या यात्रेचे स्वरूप आले आहे.मोठमोठ्या नेत्यांच्या आणि आमदार आणि मंत्र्यांच्या काॅर्नर सभा आणि मेळावे हे जोरदार सुरू आहेत.पण सध्या पंढरपुर शहरात मात्र पांडुरंग परिवार आणि दामाजी परिवार हा लोकांना भेटून चर्चा करून मन आणि मत परिवर्तन करण्यात अग्रेसर ठरत आहेत.पंढरपूर शहरातून “न भूतो न भविष्यती” अशा प्रकारे आदरणीय आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान आवताडे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी पांडुरंग-दामाजी परिवारातील सदस्यांनी चंग बांधला आहे असे दिसून येते आहे.पांडुरंग-दामाजी परिवारातील सनी पवार,शरद चव्हाण सर, व संग्राम देवकुळे यांनी आंबेडकर नगर रमाई नगर,महापुर चाळ छ.संभाजी चौक व संतपेठ परिसरातील मतदारांना व्यक्तीगत संवाद साधत मजबूत बांधणी केली आहे.या निवडणूकीत समाधान आवताडे यांच्या विजयाच्या गुलालातूनच स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक मालकांना श्रद्धांजली अर्पण करू अशी भावना यावेळी सर्वांनी आवर्जून नमूद केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button