Amalner

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्या प्रकरणी त्रिपुरा सरकार बरखास्त करावे..फैजाने चिशतीया बहुउद्देशीय संस्थेचे निवेदन..

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्या प्रकरणी त्रिपुरा सरकार बरखास्त करावे..फैजाने चिशतीया बहुउद्देशीय संस्थेचे निवेदन..

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर शहरातील फैजाने चिशतीया बहुउद्देशीय संस्था संचलित सुन्नी दारूल कज़ा च्या वतीने प्रांत अधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय राष्ट्रपती महोदय यांना इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्या बद्दल त्रिपुरा सरकार तात्काळ बरखास्त करून कडक कारवाई करण्यात यावे असे मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले
सुन्नी दारूल कज़ा च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदरील घटनेचा निषेधार्थ निवेदन देण्यात येत आहे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे अवमान करणारे त्रिपुरा सरकार चे जाहिर निषेध करण्यात येत आहे तसेच त्रिपुरा येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर व समाजातील धार्मिक स्थळांची तोडफोड व विटंबना केली जात आहे आणि उत्तर प्रदेशातील वसीम रजवी याने पण पवित्र कुराण बाबत व मोहम्मद पैगंबर यांच्या वर टिप्पणी केली असून त्याच्या विरुद्ध पण गुन्हा दाखल करण्यात यावे व सदरील विषयावर लवकरात लवकर सक्तीची कडक कारवाई होवावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सुन्नी दारूल कज़ाचे अध्यक्ष फयाज पठाण कुरैशी, हाजी अब्दुल कादर जनाब, फिरोज मिस्तरी, रफीक मिस्त्री, हाजी शब्बीर पहेलवान, मुस्लिम मोर्चा तालुकाअध्यक्ष नवीद शेख, गुलाम नबी पठाण, सईद तेली, मोहसीन खान फरीदखान, जाविदखान, सईद शेख, सह आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button